शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

अंबरनाथ एमआयडीसीत 2 मोठ्या केमिकल टाक्यांचा स्फोट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2021 15:19 IST

कंपनी प्रशासनाने दडवली अपघाताची माहिती

ठळक मुद्देसुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. या कंपनीच्या शेजारीच लागून अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने भुयारी गटार लाईन टाकण्याचे काम सुरू होते.

अंबरनाथ: अंबरनाथ वडोलगाव एमआयडीसी मध्ये एका केमिकल कंपनीत दोन मोठ्या रासायनिक टाक्यांचा स्फोट झाल्याने संपूर्ण केमिकल कंपनी आणि परिसरात वाहून गेले. एवढी मोठी घटना घडल्यानंतर देखील कंपनी प्रशासनाने त्याची माहिती अग्निशामक दलाला दिली नाही.        वडोलगाव एमआयडीसी मधील पॅरामाउंट मिनरल्स अँड केमिकल्स कंपनीमध्ये बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास एक मोठा स्फोट होऊन त्यात कंपनीतील रासायनिक द्रव्य साठवण्यासाठी तयार करण्यात आलेले एक लाख लिटर क्षमतेची टाकी फुडून सर्व केमिकल हे कंपनी परिसरात वाहून गेले. या टाकीतील सर्व द्रव्य कंपनीच्या आवारात पसरल्याने एकच हाहाकार माजला होता. याच टाकीच्या बाजूला लहान टाकी देखील होती. त्यावर देखील रासायनिक द्रव्यांचा लोड आल्याने ती टाकी देखील फुटून मोठा अपघात घडला. 

सुदैवाने या अपघातात कोणालाही इजा झाली नाही. या कंपनीच्या शेजारीच लागून अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने भुयारी गटार लाईन टाकण्याचे काम सुरू होते. त्या ठिकाणी संपूर्ण यंत्रसामुग्री काम करण्यासाठी आलेली असतानाच या टाकीचा स्पोर्ट झाल्याने सर्व केमिकलयुक्त द्रव्य पालिकेच्या यंत्रसामग्रीवर पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या ठिकाणी कोणताही कर्मचारी काम करीत नसल्याने त्यांना इजा झाली नाही.  सर्व प्रकार सकाळी घडलेला असताना देखील त्याची साधी कल्पना देखील अग्निशामक विभागाला देण्यात आली नाही. एवढेच नव्हे तर अंबरनाथ पोलीस ठाणे देखील या अपघाताबाबत अनभिज्ञ होते.      हा सर्व प्रकार पालिकेच्या ठेकेदाराने पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर घटनास्थळी तब्बल तीन तासानंतर अग्निशामक दलाची यंत्रणा पोहोचली. त्यासोबत पोलीस देखील घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी गेले. एवढ्या मोठ्या अपघाताची माहिती लपविणाऱ्या कंपनी व्यवस्थापकावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.  हा सर्व प्रकार घडल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी देखील घटनास्थळी येऊन पाहणी केली. या कंपनीला तीन महिने आधी रासायनिक प्रदूषणाच्या नावाखाली बंद करण्यात आले होते. अवघ्या काही दिवसांपूर्वी ही कंपनी नव्याने सुरू करण्यात आली होती. त्यातच हा अपघात घडल्याने कंपनीच्या संपूर्ण यंत्रणेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :thaneठाणेambernathअंबरनाथMIDCएमआयडीसी