शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

पावणेचार लाख बाप्पांना भावपूर्ण निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 03:09 IST

जिल्ह्यात भक्तांचा उत्साह शिगेला : पर्यावरण संवर्धनास प्राधान्य, प्रशासकीय यंत्रणा सज्ज; निर्माल्यकलशांचीही केली व्यवस्था

ठाणे : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात मोठ्या भावपूर्ण वातावरणात शुक्रवारी दीड दिवसासाठी विराजमान झालेल्या घरगुतीसह सार्वजनिक अशा तीन लाख ७८ हजार ७३३ ठाणेकरांनी निरोप दिला. यंदाही शेकडो भाविकांनी पर्यावरणाच्या संवर्धनासाठी थेट तलावांमध्ये विसर्जन करण्याऐवजी पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मूर्ती विसर्जनाला प्राधान्य दिले.ठाणे महानगरपालिकेने यावर्षीही इकोफ्रेण्डली गणेशोत्सव संकल्पना राबवून गणेशमूर्ती विसर्जनासाठी विशेष कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. रायलादेवी, उपवन, आंबेघोसाळे, टिकुजिनीवाडी, बाळकुम, खारेगाव आदी कृत्रिम तलावांचा यामध्ये समावेश होता. त्याचप्रमाणे तलाव परिसरात ठिकठिकाणी निर्माल्यकलशही उभारले होते. तसेच वैद्यकीय पथक, अग्निशमन दल, विद्युतव्यवस्था, ध्वनिक्षेपक यंत्रणा आदी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. विसर्जन घाट आणि कृत्रिम तलावांच्या ठिकाणी सीसीटीव्हींद्वारे पोलिसांनी विशेष निगराणी ठेवली होती. प्रत्येक विसर्जन तलावांच्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीला खासगी कार्यकर्ते होते.विसर्जनादरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त होता. गुरुवारी वाजत गाजत आगमन झालेल्या बाप्पाला लगेच निरोप देणे भक्तांच्या जीवावर आले होते. मात्र, तरीही ढोलताशांच्या गजरात बाप्पाला पुन्हा लवकर यायचे आमंत्रण देत विसर्जन केले.विसर्जन घाटावर भक्तांची गर्दीदीड दिवस गणरायाची भक्तिभावाने पूजा केल्यानंतर पर्यावरणाभिमुख गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेसह आयुक्तालयातील सहाही महापालिकांनी केलेल्या विशेष विसर्जन घाटांचा गणेशभक्तांनी आवर्जून लाभ घेतला. 

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवthaneठाणे