शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मजुरांअभावी यंत्रमाग कारखान्यांची धडधड बंद; व्यावसायिक आर्थिक मंदीच्या कचाट्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:21 IST

कापडाची निर्मिती व व्यापार मोठ्या प्रमाणात असल्याने भिवंडीत यंत्रमाग व्यवसाय वाढला होता.

- नितीन पंडित भिवंडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनचा फटका शहरातील यंत्रमाग व्यवसायाला चांगलाच बसला आहे. परप्रांतीय मजूर गावाला गेले असल्याने मजुरांअभावी यंत्रमाग कारखाने सध्या बंदच आहेत. लॉकडाऊन व मजुरांच्या स्थलांतरामुळे यंत्रमाग व्यवसाय पुरता डबघाईला गेला आहे. मागील चार महिन्यांपासून कारखाने बंद असल्याने यंत्रमाग व्यावसायिक प्रचंड आर्थिक संकटात सापडले आहेत. शहरात केवळ ५० ते ६० टक्के यंत्रमाग व्यवसाय सुरू आहे. मजुरांचा दिवसभराचा खर्च सोडवता यावा, यासाठी फक्त एकाच पाळीत कारखाने सुरू असून फक्त कच्च्या कापडाची साठवणूक करण्यासाठीच हे यंत्रमाग सुरू आहेत. उर्वरित कारखाने बंदच आहेत.

कापडाची निर्मिती व व्यापार मोठ्या प्रमाणात असल्याने भिवंडीत यंत्रमाग व्यवसाय वाढला होता. एकेकाळी देशविदेशांतील बाजारपेठांवर अधिराज्य गाजविलेला भिवंडीतील यंत्रमाग व्यवसाय मात्र लॉकडाऊनमुळे पुरता डबघाईला आला आहे. २००७ मध्ये भिवंडीत वीज वितरण व बिल वसूल करण्यासाठी टोरंट पॉवर कंपनीची नेमणूक केली. येथूनच या व्यवसायाला उतरती कळा लागली. महावितरणच्या काळात या यंत्रमाग कारखान्यांना जे बिल यायचे, ते टोरंटच्या काळात तिप्पट, चौपट वाढले.

टोरंटने कारभार हाती घेतल्यापासून वीजचोरी थांबली, हे जरी खरे असले तरी छोटा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्याचा चांगलाच फटका बसला. त्यातच वीजचोरीच्या पोलीस केस व आर्थिक भुर्दंड सहन न झाल्याने अनेक छोट्या यंत्रमाग व्यापाºयांनी आपले यंत्रमाग विकले व व्यवसाय बंद केला. आर्थिककोंडीत सापडलेल्या व बंद होत असलेल्या व्यवसायाला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य व केंद्राकडून विविध योजना राबविल्या. मात्र, छोट्या व्यापाºयांना या योजनांचा हवा तसा उपयोग झाला नाही. राजकीय वरदहस्त असलेल्या व अनेक मोठ्या यंत्रमाग व्यापाºयांनीच या योजनांचा लाभ घेतला. नोटाबंदी व जीएसटीमुळेही यंत्रमाग व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. कोरोना संकटाने या व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे.

कोणतेही निश्चित धोरण नाही

कोरोनाच्या संकटामुळे भिवंडीतून कापड प्रक्रियेसाठी राजस्थान, सुरत, अहमदाबाद येथे जाणारा कच्चा माल ट्रान्सपोर्टअभावी कारखान्यातच साठविण्याची वेळ आली आहे. त्यातच यंत्रमागाबाबत सरकारचे कोणतेही धोरण निश्चित नसल्याने त्याचाही फटका यंत्रमाग व्यवसायाला बसला आहे, अशी प्रतिक्रिया भिवंडीतील यंत्रमाग व्यावसायिक भूषण रोकडे यांनी दिली.