शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पादचारी पुलाच्या कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 00:10 IST

कोपर स्थानकात उभारले पिलर : पाया, जिन्यासाठीही खोदकाम

अनिकेत घमंडी 

डोंबिवली : कोपर स्थानकात दिव्याच्या दिशेला पादचारी पूल नसल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून रूळ ओलांडावे लागत आहेत. त्यात प्रवाशांना अपघात झाले असून, काहींना जीवही गमवावे लागले आहेत. त्यामुळे पादचारी पूल उभारण्याची मागणी रहिवाशांकडून होत होती. रेल्वे प्रशासनाने त्याची दखल घेत पादचारी पुलाचे काम हाती घेतले आहे. दिव्याच्या दिशेला पूर्वेस पुलाचे पिलर उभारले आहेत.तर, पश्चिेकडे स्वच्छतागृहानजीक पाया व जिन्यासाठी खोदकामास केले आहे.

कोपर स्थानकात दिव्याच्या दिशेला पूल उभारण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, नगरसेवक रमेश म्हात्रे, मुकुंद पेडणेकर आदींनी केली होती. दरम्यान, पावसाळा संपल्यानंतर आता तेथे कामाला वेग आला आहे. पूर्वेला अगोदरच फाउंडेशनचे काम करण्यात आले होते. आता पिलर उभारण्यात आले आहेत. पश्चिमेस स्वच्छतागृहानजीक पिलर उभारल्यानंतर त्यावर गर्डर उभारण्यात येईल, अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. जूनच्या अगोदर या पुलाचे काम बहुतांशी पूर्ण करण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे.कोपर स्थानकात सध्या कल्याण दिशेला पूर्व-पश्चिम जोडणारा पादचारी पूल आहे. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलासमवेतच दिवा-वसई मार्गावरील अप्पर कोपर स्थानकातून फलाटात येणाºया जुन्या जोड पुलाचेही काम करावे, अशी प्रवाशांची मागणी होती. मात्र, ती प्रलंबित असल्याने त्याची पूर्तता कधी होणार, असा सवालही प्रवासी करत आहेत.दिव्याच्या दिशेला उभारण्यात येणाºया पुलाचे गर्डर उभारण्यासाठी रेल्वेने वेळीस ट्रॅफिक-मेगाब्लॉक घ्यावेत,अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे. केवळ पुलाचा सांगाडा उभा करून काहीही उपयोग नाही. त्यावर गर्डर टाकूनतो पूर्णत्वास नेण्यावर भर देणेगरजेचे आहे.पूल उभारल्यानंतर पूर्वेला तातडीने संरक्षक भिंत बांधावी, जेणेकरून कोणीलाही रूळ ओलांडता येणार नाही, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पूल प्रवाशांसाठी कधीपर्यंत खुला होईल, याची माहिती घेण्यासाठी रेल्वेच्या अभियंत्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून माहिती मिळू शकली नाही.होम फ्लॅटफॉर्मचे काम कासवगतीनेकोपर स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचेही काम वर्षभरापासून कासवगतीने सुरू आहे. हे काम वेगाने करून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली.डोंबिवलीतील पुलाचे प्राधान्याने कराच् डोंबिवली स्थानकातील कल्याण दिशेकडील पादचारी पुलाचेही लोखंडी पिलर १५ दिवसांपूर्वी टाकण्यात आले होते. मात्र, त्यानंतर फारसे काम झाले नसल्याचे निदर्शनास येत आहे.च् ठाकुर्ली रेल्वे स्थानकातील पादचारी पुलासाठी बुधवारी गर्डर टाकण्यात येणार आहेत. पण त्या आधी मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवलीतील पादचारी पुलाचे काम रेल्वेने वेगाने करायला हवे होते, अशी चर्चा डोंबिवलीतील प्रवाशांमध्ये सुरू होती.

टॅग्स :thaneठाणेdombivaliडोंबिवली