शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रीसाठी विशेष मेहेरबानी; भरपावसात बनवला रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 22:34 IST

शहरातील अन्य खड्ड्यांकडे दुर्लक्ष

मीरा रोड : शहरात सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून खड्ड्यांनी एका तरुणाचा बळी घेतला आहे. खड्डे कायम असताना मीरा-भार्इंदर महापालिकेने मात्र एका खाजगी नवरात्रोत्सवासाठी चक्क भरपावसात बेकायदा डांबरी रस्ता बनवण्याचे काम केल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी मनसेने केली आहे.भार्इंदर पश्चिमेला उड्डाणपुलाखालून मीरा रोडच्या दिशेला जाणाºया रस्त्यावर फारशी लोकवस्ती नसून वर्दळही नाममात्र असते. तरीही, पालिकेने काही वर्षांपूर्वी येथे डांबरी रस्ता बनवून ठेवला आहे. आता या ठिकाणी नवरात्रोत्सव होणार आहे. या ठिकाणी मोठे कलाकार आणले जाणार असून नवरात्रीच्या आड राजकीय प्रसिद्धीचा दांडियाही रंगणार आहे.दरम्यान, महापालिकेने या राजकीय वरदहस्त असलेल्या हायप्रोफाइल नवरात्रीसाठी या ठिकाणी असलेला जुना रस्ता न खोदताच आहे, त्या रस्त्यावर चक्क खडी टाकून रस्ता उंच केला आहे. खडीवर डांबर टाकले आहे. पावसाळा सुरू असताना त्या ठिकाणी खडी व डांबराचा वापर करून रस्ता बनवणे चुकीचे आहे. पालिकेने मात्र पॅचवर्कच्या नावाखाली चक्क रस्ताच नवरात्रीसाठी बनवून दिला आहे.महापालिका आयुक्त बालाजी खतगावकर, शहर अभियंता शिवाजी बारकुंड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. पालिका सूत्रांनी मात्र खड्डे पडले होते म्हणून रस्ता बनवल्याची सारवासारव केली आहे. शहरातील अन्य रस्त्यांवर पडलेले खड्डे पालिका प्रशासन कधी बुजवणार असा सवाल येथील नागरिकांनी विचारला आहे.मनसेकडून टीकेची झोडयाप्रकरणी मनसेचे गणेश बामणे यांनी पालिकेवर टीकेची झोड उठवली आहे. सर्वसामान्य नागरिकांचे जीव खड्ड्यांनी जात असताना पालिकेला मात्र त्याच्याशी काही देणेघेणे नाही. शहरभर खड्डे पडले असताना तेथे मात्र पावसाचे कारण दिले जाते आणि येथे मात्र महापौर डिम्पल मेहता, आमदार नरेंद्र मेहता व कुटुंबीयांशी संबंधित असलेल्या संस्था-कंपनीच्या खाजगी व्यावसायिक नवरात्रोत्सवासाठी मात्र रस्ताच बनवून दिल्याचे सांगत बामणे यांनी निषेध केला आहे.

टॅग्स :Navratriनवरात्री