शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या कर्णशांततेसाठी पूजेसाठीही स्पीकरबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 01:02 IST

रेमन्डच्या गेस्ट हाऊसमध्ये मुंबई, ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे वास्तव्य असल्यानेच त्यांच्या सुचनेनुसारच येथील भाग नो साउंड झोन झाला आहे.

अजित मांडके ठाणे : ठाण्यातील शांतता क्षेत्रात अनेकदा मोठ्या आवाजात लाउड स्पीकर लावण्याच्या घटना नेहमीच घडतात. मात्र, शांतता क्षेत्र नसतानाही ठाण्यातील लक्ष्मी चिरागनगर भागातील रहिवाशांना सत्यनारायणच्या पूजेला, हळदीला, शिवजंयतीला अथवा कोणत्याही सण, उत्सवाला लाउड स्पीकर, बॅन्जो वाजविण्याची परवानगी दिली जात नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. जो अशा प्रकारचे कृत्य करेल त्याच्यावर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे. केवळ रेमन्डच्या गेस्ट हाऊसमध्ये मुंबई, ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे वास्तव्य असल्यानेच त्यांच्या सुचनेनुसारच येथील भाग नो साउंड झोन झाला आहे.गेल्या सहा महिन्यांपासून लक्ष्मी चिरागनगरच्या रहिवाशांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे. जानेवारी महिन्यात येथील एका घरात सत्यनारायणची पुजा आयोजिली होती. सकाळी १० च्या सुमारासच पोलिसांनी या कुटुंबाची साउंड सिस्टिम जप्त केली. याच भागातील अन्य एका गरीब मुलीची हळद होती. त्यासाठी येथील रहिवाशांनी अक्षरश: वर्गणी करुन बॅन्जो ठरवला होता. मात्र, तोदेखील सांयकाळी ८ च्या सुमारास पोलिसांकडून जप्त करण्यात आला.ठाण्यातील शांतता क्षेत्रातही नियमांचे उल्लघंन केले जाते. मात्र, त्यांच्यावर अशाप्रकारे तत्परतेने कारवाई केली जात नाही. परंतु, मागील सहा महिन्यांपासून चिरागनगर भागात कोणताही उत्सव असो किंवा सण असो, साउंडचा वापर केला की लागलीच वर्तकनगरचे पोलीस येऊन साउंड, बॅन्जो जप्त करतात.वास्तविक पाहता रात्री १० वाजेपर्यंत साउंड सुरू ठेवण्यास परवानगी असताना अशी चुकीची कारवाई केली जात असल्याने येथील रहिवाशांनी पोलीस आयुक्तांपर्यंत यासंदर्भातील तक्रार केली होती. परंतु, तिचाही काहीच उपयोग झाला नसल्याने दाद मागायची कोठे असा सवाल येथील रहिवाशांनी केला आहे. त्यातही पोलिसांच्या विरोधात बोलायचे झाले, तरी कारवाईची भिती असल्याने ते या तक्रारीच्या बाबतीत बोलतानाही घाबरत आहेत. परवानगी का नाकारली जाते याचे उत्तर पोलिसांकडेदेखील नाही. हा भाग शांतता क्षेत्रही नाही, मग ठाण्यातील इतर भागांप्रमाणेच या भागाला न्याय देणे अपेक्षित असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.>म्हणून होते कारवाई...: चिरागनगरच्या बाजूलाच रेमंडचे गेस्ट हाऊस आहे, पोलीस आयुक्त दर्जाचे अधिकारी येथे वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांना जरी याचा आवाज झाला तर म्हणे त्रास होत आहे. त्यामुळेच पोलिसांकडून हा कारवाईचा ससेमीरा सुरू झाल्याचेही रहिवासी सांगतात. मात्र, याच रेमंडमध्ये रात्री १२ वाजेपर्यंत धिंगाणा सुरू असतो, त्याचा त्रास या वरिष्ठ मंडळींना होत नाही का? असा सवालही रहिवाशांनी उपस्थित केला आहे.>असा कोणताही प्रकार येथे सुरू नाही. केवळ १० वी आणि १२ वीच्या परीक्षा सुरू असल्यानेच येथे साउंडला परवानगी दिली जात नाही.- एस. गायकवाड, वरिष्ठ पोलीसनिरीक्षक - वर्तकनगर पोलीस ठाणे