शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

डम्पिंगसाठी ठाण्याबाहेर जागा, महासभेत झाला निर्णय; महापौरांनी दिले भूखंड शोधण्याचे निर्देश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 00:47 IST

Thane : कोलशेत येथील मेट्रो यार्डच्या जागेचा वाद या सभेत सुरू असताना याच ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन विभागाने जागा आरक्षित केली आहे.

ठाणे : गेली कित्येक वर्षे डम्पिंगचा प्रश्न हा अनुत्तरितच आहे. तो सोडविण्यासाठी दिव्यातील स्थानिक नगरसेवक तथा माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांनी बुधवारी झालेल्या महासभेत आवाज उठविला होता. मुंबई महापालिकेने त्यांच्या हद्दीच्या बाहेर अंबरनाथ येथे डम्पिंग सुरू केल्याने त्याच धर्तीवर ठाणे महापालिकेनेही आपल्या हद्दीबाहेरच्या जागेचा शोध घ्यावा, असा निर्णय या महासभेने घेतला. त्यानुसार आता प्रशासनाने नवीन जागेचा शोध सुरू केला आहे.कोलशेत येथील मेट्रो यार्डच्या जागेचा वाद या सभेत सुरू असताना याच ठिकाणी घनकचरा व्यवस्थापन विभागाने जागा आरक्षित केली आहे. ती ताब्यात घेण्याविषयी चर्चा सुरू असताना मढवी यांनी दिव्याचे नागरिक डम्पिंगच्या त्रासाने कंटाळले असून ते हटविण्याची मागणी केली. ठाणे शहरातील लोकवस्ती झपाट्याने वाढत असताना कचरा प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. महानगरपालिकेचा एकही कचरा विल्हेवाट प्रकल्प नसून दिव्यात खाजगी जागांवर महापालिका कचरा टाकते. तेथील स्थानिकांकडून दिव्यातील डम्पिंग रद्द करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे कचरा विल्हेवाटीचा प्रश्न सोडण्यासाठी पर्यायी मार्गांची चाचपणी करण्याची आवश्यकता महासभेमध्ये नगरसेवकांकडून यावेळी व्यक्त करण्यात आली.

नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवण्याचे निर्देश- शहरात कचरा विल्हेवाटीसाठी घनकचरा व्यवस्थापनाच्या विविध ठिकाणी जागा आरक्षित आहेत. परंतु, अनेक ठिकाणी त्यांच्या परिसरात गृहसंकुले उभी राहिल्याने कचरा टाकण्यासाठी दिवा डम्पिंगवर अवलंबून राहावे लागत आहे. - विशेष म्हणजे दिव्याच्या जागेची क्षमता संपल्याने ते बंद करावे, असे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाने सुचविले आहे. त्यामुळे महापालिकेने पर्यायी जागांचा शोध सुरू केला होता. परंतु, कचरा प्रकल्प आपल्या भागात येऊ नये, यासाठीच सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला आहे. - पर्यायी व्यवस्था म्हणून ठाण्याबाहेरील ग्रामीण भागामध्ये जागा उपलब्ध असल्यास तिचा शोध घेऊन नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविण्यात येतील का, याच्या चाचपणीचे निर्देश महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी प्रशासनाला दिले.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका