शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

ठाण्यातील फटाक्यांचा आवाज खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 00:47 IST

बाजारातील १४ फटाक्यांची केली तपासणी; प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली ध्वनिपरीक्षा

ठाणे : फटाक्यांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने बुधवारी ठाण्यात फटाक्यांची ध्वनिपातळी तपासणी झाली. या तपासणीमध्ये ठाण्याच्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या सुमारे १४ मोठ्या फटाक्यांपैकी सर्वच फटाके विहीत ध्वनिमर्यादेत असल्याचे आढळले. त्यामुळे हे सर्वच फटाके या तपासणीत पास झाले आहेत.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने दरवर्षी विभागनिहाय फटाक्यांच्या ध्वनिपातळीची तपासणी केली जाते. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. ठाणे विभागातील फटाक्यांची तपासणी बुधवारी दुपारी रायलादेवी लेक प्रिमायसेस येथे करण्यात आली. ठाणे मार्केटमधून विविध कंपन्यांचे सुमारे १४ फटाके तपासणीसाठी आणले होते. यावेळी व्होल्वोबॉम्ब, सद्दाम आॅटोबॉम्ब, वुल्कॅनो, पेंटा स्काय फ्लॅश, रेड गार्लंड क्रॅकर्स ५०००, दसेरा क्रॅकर्स, १२ स्टार ग्रीन, ३० वंडर्स, क्लाउड रायडर्स, गिक्सर्स या सगळ्या फटाक्यांची ध्वनिपातळी मर्यादेपेक्षा कमी आढळून आली.रात्री १० नंतर फटाके फोडल्यास गुन्हेकल्याण : दिवाळीत रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवण्याचे निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने घातले आहेत. त्यामुळे रात्री १० नंतर फटाके वाजवणाऱ्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या मदतीने गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी ‘लोकमत’ला दिली. दिवाळीत फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायुप्रदूषण होते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयानुसार रात्री १० नंतर फटाके वाजवणाºयांवर परिमंडळ-३ मधील पोलीस कारवाई करणार आहेत, असे ते म्हणाले.फटाकेविक्रेत्यांना कलम १४९ अंतर्गत ७० डेसिबलपेक्षा जास्त आवाजाचे फटाके न विकण्याची नोटीस दिली जाणार आहे. शांतता क्षेत्र, रहिवासी आणि औद्योगिक परिसरासाठी ध्वनिमर्यादा आखली आहे. मोठ्या आवाजाचे फटाके विकणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्याचबरोबर निवासी संकुलांमध्ये जागृतीही करणार असल्याचे दिघावकर यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे कुठे उल्लंघन होत आहे का, हे पाहण्यासाठी विशेष पोलीस पथके नेमण्यात येतील. या पथकांकडे डेसिबल मशीन असणार असून त्याआधारे ध्वनिमर्यादेचे उल्लंघन होत आहे का, याचा शोध घेतला जाणार आहे. मोठ्या आवाजाचे फटाके फोडणाºया ठिकाणांवर व्हिडीओ रेकॉर्डिंगच्या आणि डेसिबल मशीनच्या साहाय्याने कारवाई केली जाईल.या फटाक्यांच्या आतषबाजीत हे प्राणी आणि पक्षी जखमी होऊन त्यांना इजा होते. तसेच, मानसिक आघातही होतो. गेल्या काही वर्षांत अनेक पक्षी आणि प्राण्यांवर उपचार केले. - महेश बनकर, पक्षिमित्रफटाक्यांच्या दुष्परिणामांबाबत आम्ही विद्यार्थ्यांत जागृती करत आहोत. फटाके घेण्याऐवजी गरिबांना अन्नदान करावे, असे आवाहन केले आहे. - जीवन विचारे,एनएसएस कार्यक्रम अधिकारीध्वनी आणि वायुप्रदूषणामुळे होणारे शारीरिक तसेच मानसिक आजार पाहता नागरिकांनी कमीतकमी आवाजाचे फटाके फोडावेत. रस्त्यांवर फटाके वाजवताना काळजी घ्यावी. नागरिकांना त्रास किंवा इजा होईल, अशा ठिकाणी फटाके वाजवू नयेत. कोणी असे करत असल्यास नागरिकांनी पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला याची माहिती द्यावी.- प्रताप दिघावकर,अपर पोलीस आयुक्त

टॅग्स :fire crackerफटाकेDiwaliदिवाळीthaneठाणे