डोंबिवली: येथील २७ गावांचा भाग असलेल्या पी अॅण्ड टी कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी येत नसल्याने स्थानिक नगरसेविका रूपाली म्हात्रे यांनी सोमवारी कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्य जलवाहीनीवरून कनेक्शन घेतले गेले असतानाही केवळ वितरण व्यवस्था योग्यप्रकारे न केल्याने पाणी समस्या उदभल्याकडे लक्ष वेधण्यात आले यावर तातडीने वितरण व्यवस्था सुरळीत केली जाईल असे आश्वासन बोडके यांनी दिले. जर समस्या न सुटल्यास उपोषण अटळ असल्याचा इशारा नगरसेविका म्हात्रे यांनी यावेळी दिला.नांदिवली तर्फ पंचानंद प्रभागातील पी अॅण्ड टी कॉलनीमध्ये गेल्या १५ दिवसांपासून पाणी येत नसल्याने येथील बहुतांश इमारतींना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. होळीपासून हा त्रास सुरू झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यात लघुपाटबंधारे विभागाकडून जुलै महिन्यापर्यंत धरणातील उपलब्ध पाणी साठयाचे नियोजन करण्याच्या अनुषंगाने पाणी कपात लागू झाली आहे. उदभवलेल्या पाणी समस्येला केडीएमसी प्रशासनच जबाबदार असल्याकडे लक्ष वेधत नगरसेविका म्हात्रे यांनी सात एप्रिलपासून उपोषण छेडण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पुर्वी म्हात्रे यांनी सोमवारी आयुक्त बोडके यांची भेट घेऊन पाणी समस्येप्रकरणी चर्चा केली. यावेळी आमदार भोईर, महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृहनेते आणि शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, तालुकाप्रमुख एकनाथ पाटील, ग प्रभाग समिती अध्यक्षा अलका म्हात्रे, नगरसेवक नितिन पाटील, नगरसेविका प्रेमा म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, रवी म्हात्रे आदिंसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पी अॅण्ड टी कॉलनीतील पाणीसमस्येसह नांदीवली, सोनारपाडा व देशमुख होम्स येथील पाण्याच्या प्रश्नावर देखील चर्चा करण्यात आली.आज घेणार जलसंपदामंत्र्यांची भेटआयुक्त बोडके यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन मिळाले असलेतरी मंगळवारी नगरसेविका म्हात्रे या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे पाणी समस्या मांडणार आहेत. त्यामुळे आयुक्तांपाठोपाठ उदया जलसंपदा मंत्री काय आश्वासन देतात याकडे लक्ष लागले आहे.
लवकरच वितरण व्यवस्था सुरळीत होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 18:26 IST
डोंबिवली: येथील २७ गावांचा भाग असलेल्या पी अॅण्ड टी कॉलनीमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी येत नसल्याने स्थानिक नगरसेविका रूपाली म्हात्रे यांनी सोमवारी कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत केडीएमसीचे आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेऊन चर्चा केली. मुख्य जलवाहीनीवरून कनेक्शन घेतले गेले असतानाही केवळ वितरण व्यवस्था योग्यप्रकारे न केल्याने पाणी समस्या उदभल्याकडे लक्ष वेधण्यात आले यावर तातडीने वितरण व्यवस्था सुरळीत केली जाईल असे आश्वासन बोडके यांनी दिले. जर समस्या न सुटल्यास उपोषण अटळ असल्याचा इशारा नगरसेविका म्हात्रे यांनी यावेळी दिला.
लवकरच वितरण व्यवस्था सुरळीत होईल
ठळक मुद्देपी अॅण्ड टी पाणी समस्येवर आयुक्तांचे आश्वासन...नाहीतर उपोषण अटळ- नगरसेविका म्हात्रे