शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ठाण्यातील कोरोना रुग्णालयांत रुग्णांसाठी समुपदेशकांची लवकरच नियुक्ती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2020 17:18 IST

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सतर्कता बाळगावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

ठाणे : कोरोनाचा धसका घेतल्यामुळे रुग्णांची मानसिक स्थिती बिघडत असल्याच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील रुग्णालयांमध्ये पालिकेच्या वतीने समुपदेशकांची (कौन्सलर) नियुक्ती करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहे, असे आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले.

        कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल नागरिकांना दिलासा देण्यासंदर्भात आयुक्तांना  भाजपाच्या वतीने शुक्रवारी निवेदन दिले, त्यावेळी त्यांनी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिल्याचे डावखरे यांनी सांगितले. आयुक्तांना भेटलेल्या शिष्टमंडळात भाजपाचे नेते किरीट सोमैय्या, नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुंबरे यांची उपस्थित होते, असेेेहीह डावखरे यांनी लक्षात आणून दिले. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांची मानसिक स्थिती बिघडल्याची काही उदाहरणे आढळली आहेत.  कोरोना संदर्भात रुग्णांची काळजी घेतली जाते. मात्र, त्यांच्यावर रुग्णालयात मानसिक उपचार होत नाहीत. रुग्णालयातील वातावरणामुळे रुग्णांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे, याकडे आमदार डावखरे यांनी आयुक्तांचे लक्ष लक्ष वेधले आहे.

 पालिकेच्यावतीने रुग्णालयांमध्ये समुपदेशकांची नियुक्ती करण्यात येईल. पीपीई किट घालून समुपदेशकांकडून प्रत्येक रुग्णाशी संवाद सादला जाईल, असे आश्वासन डॉ. शर्मा यांनी दिले. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सतर्कता बाळगावी, कोरोना रोखण्यासाठी सध्या वापरात येणाऱ्या रेमडेसिवीर, टोसिझूमैब औषधांचा साठा पालिकेने मागवावा, खाजगी रुग्णालयांमध्ये सुरू असलेली रुग्णांची लूट रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात आदी मागण्या भाजपाच्या वतीने यावेळी आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस