शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘सोनू तुझा माझ्यावर...’ गरबाप्रेमी थिरकणार, सरावाला जोर, वेस्ट़र्नऐवजी पारंपरिक संगीतावर ताल धरण्याकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2017 06:39 IST

‘सोनू.. तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?’ या गाण्याने सर्वांना वेड लावले असताना यंदा नवरात्रौत्सवात ठाण्यातील गरबाप्रेमी या गाण्यावर थिरकरणार आहेत. गतवर्षी गरब्यामध्ये ‘झिंग झिंग झिंगाट’चा फिव्हर होता. यंदा मात्र ‘सोनू...’चा तडका दिसून येणार आहे. गणेशोत्सवानंतर ठाणेकरांना नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. अवघ्या आठ दिवसांवर हा उत्सव आला आहे.

- प्रज्ञा म्हात्रे ठाणे : ‘सोनू.. तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?’ या गाण्याने सर्वांना वेड लावले असताना यंदा नवरात्रौत्सवात ठाण्यातील गरबाप्रेमी या गाण्यावर थिरकरणार आहेत. गतवर्षी गरब्यामध्ये ‘झिंग झिंग झिंगाट’चा फिव्हर होता. यंदा मात्र ‘सोनू...’चा तडका दिसून येणार आहे.गणेशोत्सवानंतर ठाणेकरांना नवरात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. अवघ्या आठ दिवसांवर हा उत्सव आला आहे. उत्सवात गरबा खेळण्यासाठी गरबाप्रेमींचा उत्साह दिसून येत आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन-तीन महिने अगोदर सिझनल क्लासेस सुरू झाले आहेत. हौशी आणि स्पर्धेत सहभागी घेणारे मुरब्बी गरबाप्रेमी या क्लासेसमध्ये जाऊन रितसर गरबा शिकतात. जसजसे दिवस जवळ येतात तसतसा गरबाप्रेमींचा सराव जोर धरतो. दरवर्षी गरबा शिकवणारे नृत्यदिग्दर्शक हे नाविन्यता आणण्याचा प्रयत्न करतात. यंदा नृत्यदिग्दर्शिका वैशाली सत्रा यांनी ‘सोनू.. तुझा माझ्यावर भरोसा नाय काय?’ या गाण्यावर गरबा बसवला आहे. १४ स्टेप्सचा हा गरबा असून या गरब्याला हिपॉपची जोड दिली गेली आहे. स्लो आणि फास्ट अशा दोन्ही ट्रॅकवर हा गरबा खेळला जाऊ शकतो. ५ वर्षाच्या बाल गरबाप्रेमींपासून ६० वर्षाचे गरबाप्रेमी आजोबा हा नवीन गरबा खेळू शकतात. यात कितीही गरबाप्रेमी सहभागी होऊ शकतात, असे वैशाली यांनी सांगितले. याखेरीज ‘कपल दोडियो साल्सा’ या प्रकारचा ट्रेण्ड दिसून येत आहे. लहान मुलेही हा गरबा खेळू शकतात. २३ स्टेप्सचा हा गरबा असून १५ ते २० जणांचा ग्रुपने हा गरबा खेळता येतो. ‘मोर बनी थन घाट करे’ या गाण्यावर देसी गरब्याचा सराव सुरू आहे. १२ स्टेप्सचा हा गरबा आहे आणि वेगळा प्रयोग यात करण्यात आला आहे. पूर्णपणे पारंपारिक टच असलेला हा गरबा आहे. त्यानंतर साधा गरबा, पोपट, चकरी गरबा, तीन ताली गरबा यांसारखे नेहमीचे प्रकार देखील गरब्यात पाहायला मिळणार आहे.देसी गरब्याचा बोलबाला : गरब्यात मध्यंतरीच्या काळात वेस्टर्न गरब्याची धूम होती. प्रामुख्याने तरुणाई या गरब्याकडे आकर्षित होत होती. त्यामुळे गरबा शिकवणारे प्रशिक्षकही नवनवीन वेस्टर्न स्टेप्स आणि त्याप्रमाणे कॉस्च्युम परिधान करायला सांगून त्यांना शिकवित होते. पण यंदा या तरुणाईने देसी गरब्याला जास्त पसंती दिली आहे. स्पर्धेत उतरणाºया तरुणाईचा हा गरबा शिकण्याकडे जास्तीत जास्त कल असल्याचे गरब्याच्या प्रशिक्षकांनी सांगितले.यंदा गरब्यात आम्हाला नवीन प्रयोग करायचा होता. सध्या ‘सोनू...’ हे गाणे लहानांपासून मोठ्यांच्या तोंडून ऐकायला मिळते. म्हणून या गाण्याची निवड करुन हिपॉप स्टाईलमध्ये हा गरबा सेट केला आहे. सध्या याचा सराव गरबाप्रेमींकडून करुन घेतला जात आहे आणि प्रत्येकजण हा गरबा एन्जॉय करीत आहे.- वैशाली सत्रा, नृत्यदिग्दर्शिकाप्रॉप्स वापरुनही वेगवेगळ््या प्रकारांत गरबा खेळता येतो. थाळी, छत्री, दुपट्टा यांसारखे प्रॉप्स घेऊन गरबा खेळण्याचा सरावही सुरू आहे. स्पर्धेत उतरणारे गरबाप्रेमी या प्रॉप्सचा वापर करुन गरबा खेळणार आहेत असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Navratriनवरात्री