शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

सवलतीच्या दरात आदिवासी,गरीब गरोदर महिलांना सोनोग्राफी सुविधा  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 04:07 IST

अलिबाग जिल्ह्यात चालू असलेल्या कुपोषण निर्मूलन मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व खासगी सोनोग्राफी सेंटर चालक डॉक्टरांनी माफक, कमीत कमी दरात आदिवासी व गरीब गरोदर महिलांची सोनोग्राफी चाचणी करून द्यावी

अलिबाग - जिल्ह्यात चालू असलेल्या कुपोषण निर्मूलन मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व खासगी सोनोग्राफी सेंटर चालक डॉक्टरांनी माफक, कमीत कमी दरात आदिवासी व गरीब गरोदर महिलांची सोनोग्राफी चाचणी करून द्यावी, अशा केलेल्या आवाहनास जिल्ह्यातील सर्व खासगी सोनोग्राफी सेंटर चालक डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकीतून सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आदिवासी व गरीब गरोदर महिलांना सवलतीच्या केवळ ४०० रुपये दरात सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करून देण्याचे मान्य केले आहे. परिणामी येत्या काळात आदिवासी व गरीब गरोदर महिलांना ही सुविधा माफक दरात उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात प्रसूतीदरम्यान होणारे माता व बाल मृत्यू रोखणे शक्य होईल असा विश्वास रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.सोमवारी जिल्हास्तरीय गर्भलिंगनिदान विरोधी कायदा अंमलबजावणी समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, दिशाकेंद्राचे कार्यकर्ते अशोक जंगले, जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील खासगी सोनोग्राफी सेंटरचे डॉक्टर्स उपस्थित होते.आम्ही जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने मागच्या वर्षात कर्जत तालुक्यात कुपोषण निर्मूलन मोहीम राबवली होती, या मोहिमेचा चांगला परिणाम समोर आला आहे. डिसेंबर २०१७ मध्ये २०० च्या आसपास असलेला कुपोषणाचा आकडा सद्यस्थितीत १२ मुलांवर आला आहे. या मोहिमेची जिल्हाभर अंमलबजावणी करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी घेतला होता. मोहीम यशस्वी करण्यासाठी गरोदर महिलांची सोनोग्राफी होणे गरजेचे होते. संयुक्त बैठकीमध्ये सर्वांनी माफक दरात तपासणी करण्याचे मान्य केले ही आनंदाची बाब असून कुपोषण निर्मूलनासाठी त्यामुळे निश्चित गती मिळणार आहे.- अशोक जंगले, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Raigadरायगड