शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

सोनसाखळी चोरणारी इराणी जोडी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 05:52 IST

दुचाकीवरून येऊन मध्यमवयीन किंवा वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या अब्बास जाफरी (२७) आणि सादक जाफरी (२३) या दोन सोनसाखळी चोरट्यांना कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे.

ठाणे : दुचाकीवरून येऊन मध्यमवयीन किंवा वयोवृद्ध महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावणाऱ्या अब्बास जाफरी (२७) आणि सादक जाफरी (२३) या दोन सोनसाखळी चोरट्यांना कासारवडवली पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्यांच्याकडून सात लाख ८० हजारांचे २६० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.भिवंडीच्या इराणीपाड्यातील या दोघांनी गेल्या काही दिवसांपासून दुचाकीवरून येऊन वागळे इस्टेट परिमंडळातील कापूरबावडी, वर्तकनगर, चितळसर आणि कासारवडवली या पोलीस ठाण्यांच्या परिसरात अनेक महिलांचे मंगळसूत्र तसेच सोनसाखळी हिसकावल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय ढोले यांना मिळाली होती.याच माहितीच्या आधारे ११ सप्टेंबर रोजी भिवंडीतून पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक कैलास टोकले यांच्या पथकाने या दोघांनाही अटक केली. त्यांना पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्यांनी नऊ जबरी चोरीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. यामध्ये कापूरबावडीतील दोन, वर्तकनगर दोन, चितळसर दोन आणि कासारवडवली पोलीसठाण्याच्या कार्यक्षेत्रातील तीन असे नऊ गुन्हे त्यांच्याकडून उघड झाले आहेत.एकट्या जाणाºया ४५ ते ६५ वयोगटांतील महिलांना गाठून दुचाकीवरून येऊन ही दुककल सोनसाखळी किंवा मंगळसूत्र हिसकावून पलायन करत होती. त्यांच्याकडून आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.