शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: मरणयातना! लॉकडाऊनमुळे वडिलांचा मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 18:46 IST

सर्पदंशामुळे वडिलांचा मृत्यू; लॉकडाऊनमुळे मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ

- शशिकांत ठाकूरकासा- डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयातून सर्पदंश झालेल्या वडिलांना आणताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला. मात्र लॉकडाऊनमुळे मुलाला त्यांचा मृतदेह मोटारसायकलवरुन न्यावा लागला. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या लॉकडाऊन सुरू असून रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे कासा भागातील पालघर तालुक्यातील चिंचारे येथील एका व्यक्तीचा मृतदेह त्याच्या दोन मुलांनी चक्क दुचाकीवरून आपल्या घराकडे नेला. चिंचारेचे रहिवासी असलेल्या लडका देवजी वावरे (वय 60) यांना 24 मार्च रोजी सकाळी 8 वाजता  सर्पदंश झाला होता. त्यांना उपचारांसाठी कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्याचं सांगत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला. घरी आणल्यावर दुसऱ्या दिवसी (आज) त्यांना पुन्हा अस्वस्थ वाटू लागले. त्यांना मोटरसायकलवरून रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेत त्यांची प्रकृती बिघडली आणि ते मृत पावले. मात्र घरी जाण्यासाठी वाहनाची उपलब्धता नसल्याने त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना मोटरसायकलवरूनच माघारी नेण्याचा निर्णय घेतला. कासा उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य उपचार केले नसल्याने मृत्यू झाल्याचा आरोप मृतांच्या कुटुंबीयांकडून केला जात आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस