शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला आईच्या घरातून बाहेर काढता येणार नाही; हायकाेर्ट : ठाणे उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2020 03:14 IST

संबंधित पोलीस हवालदाराने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले हाेते.

 लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ज्येष्ठ व्यक्ती व पालकांची देखभाल आणि कल्याण कायद्याअंतर्गत ठाणे उपविभागीय अधिकाऱ्यांनी मुलाला आईचे घर खाली करण्याचे व आईला देखभालीचा खर्च म्हणून दरमहा १० हजार रुपये देण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाचे पालन न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पोलीस हवालदाराच्या आईला दिले.

संबंधित पोलीस हवालदाराने उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले हाेते. या याचिकेवर न्या. नितीन सांब्रे यांच्या एक सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी होती. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे वडील पोलीस खात्यातच कामाला होते. १९९१ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर ते स्वतः पोलीस खात्यात भरती झाले. वडिलांच्या पश्चात वडिलांचे दोन्ही फ्लॅट आईच्या नावे झाले. २०१५ पर्यंत याचिकाकर्ते त्यांच्या आईसह एकाच फ्लॅटमध्ये राहात होते. त्यानंतर एक बहीण आईकडे राहायला आल्यानंतर ते दुसऱ्या फ्लॅटमध्ये गेले. तो फ्लॅट दुरुस्त करण्यासाठी सुमारे आठ लाख रुपये खर्च आला. त्यानंतर बहिणीने आईला दोन्ही फ्लॅट विकण्याची गळ घातली. त्याला मुलाने नकार दिल्याने घर खाली करून घेण्यासाठी आईने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार केली.

याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, आईला कुटुंब सेवानिवृत्ती वेतन म्हणून दरमहा १५ हजार, तर पोलीस विभागात असलेल्या बहिणीलादरमहा वेतनापोटी ३० हजार रुपये मिळतात.‘पत्नी, मुलांच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी’फ्लॅट दुरुस्तीसाठी पाेलीस कल्याणकारी निधीतून उचललेले कर्ज आणि दोन मुले व पत्नीचा उदरनिर्वाह याचिकाकर्त्याला करायचा आहे. याबाबत अधिकाऱ्यांनी विचार केला नाही, असे निरीक्षण नोंदवत उच्च न्यायालयाने मुलाला आईच्या घरातून बाहेर काढण्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करण्याचे निर्देश आईला दिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय