शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

म्हाडा सोडतीत कहीं खुशी, कहीं गम; ८९८४ घरांसाठी निघाली सोडत, ठाणे जिल्ह्यातील ८१२ घरांसाठी २ लाख ७ हजार अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 07:52 IST

Mhada Lottery: कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे कल्याण, मीरारोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारलेल्या ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत गुरुवारी ठाण्यात प्रथमच पार पडली.

ठाणे : कोकण गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळातर्फे कल्याण, मीरारोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत उभारलेल्या ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्रीकरिता प्राप्त अर्जांची संगणकीय सोडत गुरुवारी ठाण्यात प्रथमच पार पडली. यापूर्वीच्या सोडती मुंबईतच होत होत्या. या घरकुलांसाठी यंदा सर्वाधिक २ लाख ४६ हजार ६५० अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे कोणाचे नशीब उघडणार याबाबत उत्सुकता होती. कोरोनामुळे ही सोडत ऑनलाइन पद्धतीने काढण्यात आली. यासाठी ठाण्यातील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात ५०० अर्जदारांना हजर राहण्याची परवानगी देण्यात आली होती. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली. सोडतीदरम्यान काहींच्या तोंडावर हसू, तर काहींच्या तोंडावर निराशा दिसून आली. ठाणे जिल्ह्यातील ८१२ घरांसाठी २ लाख ७ हजार नागरिकांनी अर्ज केले होते.

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नागरिकांना हक्काच्या घराचे शुभ वर्तमान मिळावे, यासाठी तुतारीच्या निनादात सोडत काढली जात होती. जे सोडतीला हजर राहिले त्यांना म्हाडाची ट्रॉफी देऊन त्यांचे स्वागत तुतारीच्या निनादात करण्यात आले. त्यामुळे ज्यांना घराची लॉटरी लागली त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी ३२ देशांतील नागरिक सोडत ऑनलाइन पद्धतीने पाहत असल्याचेही सांगण्यात आले. या कार्यक्रमाला जितेंद्र आव्हाड, पालकमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार रवींद्र फाटक, मुंबई इमारत पुनर्वसन मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रथमच संगणकीय पद्धतीचा वापर संगणकीय पद्धतीने अतिशय पारदर्शक पद्धतीने ही सोडत सुरू असल्याचे यावेळी उपस्थित नागरिकांनी सांगितले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता. एकूण ८,९८४ घरांपैकी ८१२ घरे ही ठाणे जिल्ह्यात होती. प्राप्त झालेल्या एकूण २ लाख ४६ हजार ६५० अर्जापैकी ठाणे जिल्ह्यासाठी तब्बल २ लाख ७ हजार नागरिकांनी अर्ज केल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी दिली. ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील सदनिकांकरिता ही सोडत काढण्यात आली होती. 

टॅग्स :mhadaम्हाडाthaneठाणे