शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

काही कवींच्या कविताही कळत नाही आणि तो कवीही कळत नाही : माधवी घारपुरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 13:39 IST

ठाण्यात सुरू असलेल्या पुस्तक आदान प्रदान महोत्सवात सकाळच्या सत्रात पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. 

ठळक मुद्देकाही कवींच्या कविताही कळत नाही आणि तो कवीही कळत नाही : माधवी घारपुरेमराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वा. अ. रेगे सभागृहात पुस्तक आदान प्रदान महोत्सवधनश्री लेले लिखीत ‘सोनचाफ्याची फुले’ (द्वितीय आवृत्ती) या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन

ठाणे: आजकाल २०० कविता लिहीणारे कवी देखील आहेत. पण त्याच्या कविताही कळत नाही आणि तो कवीही कळत नाही अशी टीका सुप्रसिद्ध लेखिका, व्याख्यात्या माधवी घारपुरे यांनी केले.  मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या वा. अ. रेगे सभागृहात पुस्तक आदान प्रदान महोत्सवात निरुपणकार धनश्री लेले लिखीत ‘सोनचाफ्याची फुले’ (द्वितीय आवृत्ती) या ललित लेख संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

          ललित लेखन म्हणजे शब्दांचा उत्सव आणि दुकानाच्या बाहेर साड्या नेसवलेले पुतळे नव्हे तर संस्कार, विचार आणि भावना याचे प्रगतीकरण म्हणजे ललित लेखन असे मार्गदर्शनपर वक्तव्य घारपुरे यांनी पुढे बोलताना केले. त्या म्हणाल्या, आपण प्रत्येक जण लेखक आहोत, आपल्यात प्रतिभेचा अकुंर आहे पण तो कोणीतरी फुंकर घालून फुलवावा लागतो. गुलाब आणि मोगऱ्यापेक्षा सोनताफ्याला त्याच्या गुणधर्माने जास्त मान असतो, त्याची तुलना कोणत्याही फुलाशी नाही. हे फुल पुष्पगुच्छात दिसत नाही कारण त्याला स्वतंत्र ओळख आहे. या फुलाचे गुणधर्म या पुस्तकात दिसते. माणूस सहृदय असेल तर ललित लेखन जन्माला येते अशा शब्दांत लेखिका लेले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, ललित लेखनाची गुणवैशिष्ट्य मी पाहते आणि जेव्हा मी माझ्या पुस्तकाकडे पाहते तेव्हा मला या गुणवैशिष्ट्याची पारडे किती जड आहे हे दिसून येते. जसा गायकाला गळा असतो तसा लेखकाच्या हाताला नियमीत सराव असावा लागतो आणि मला खुप लांबचा पल्ला गाठायचा आहे. व्यास क्रिएशन्सचे संचालक निलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक, मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या उपाध्यक्षा शीला मराठे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार श्री. वा. नेर्लेकर, अभिनेत्री दीप्ती भागवत, मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर उपस्थित होते. सुत्रसंचालन स्मिता पोंक्षे यांनी केले. ---------------------फोटो : पुस्तक प्रकाशन

टॅग्स :thaneठाणेliteratureसाहित्यcultureसांस्कृतिक