मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६ व्या वर्धापन दिनाला सदानंद मोरे यांची उपस्थिती, ३१ मे व १,२ जून रोजी पुस्तक आदान-प्रदान महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2019 04:40 PM2019-05-15T16:40:46+5:302019-05-15T16:48:44+5:30

ठाण्यात ३१ मे व १,२ जून रोजी पुस्तक आदान-प्रदान महोत्सव संपन्न होणार आहे. यावेळी श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व वा अ रेगे साहित्य पुरस्कार प्रदान होणार आहे.

The presence of Sadanand More on the 126th anniversary of the Marathi Bookstore, on 31st May and 12th, the book exchange ceremony on June 2 | मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६ व्या वर्धापन दिनाला सदानंद मोरे यांची उपस्थिती, ३१ मे व १,२ जून रोजी पुस्तक आदान-प्रदान महोत्सव

मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६ व्या वर्धापन दिनाला सदानंद मोरे यांची उपस्थिती, ३१ मे व १,२ जून रोजी पुस्तक आदान-प्रदान महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देमराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६ व्या वर्धापन दिनाला सदानंद मोरे यांची उपस्थिती३१ मे व १,२ जून रोजी पुस्तक आदान-प्रदान महोत्सवश्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार

 

ठाणे : मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेचा १२६ वा वर्धापनदिन १ जून रोजी साजरा केला जाणार आहे. यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालयातर्फ़े महाराष्ट्रातील साहित्यिकांना "श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने" व ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांना "वा. अ.रेगे साहित्य पुरस्काराने" जेष्ठ साहित्यिक, राज्य मराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. याप्रसंगी ३१ मे व १, २ जून २०१९ रोजी वाचक व साहित्यप्रेमींसाठी पुस्तक आदान-प्रदान महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेचे अध्यक्ष प्रा. विद्याधर वालावलकरव व्यास क्रिएशन या संस्थेचे प्रमुख निलेश गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.याप्रसंगी मराठी ग्रंथसंग्रहालयाचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर, व्यास क्रिएशन्सचे सल्लागार श्रीकांत नेर्लेकर, कार्यवाह चांगदेव काळे, संजय चुंबळे, अनिल ठाणेकर, कार्यकारिणी सदस्य दुर्गेश आकेरकर,वृषाली राजे आदि मान्यवर उपस्थित होते. 

        मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे या संस्थेचा १२६ वा वर्धापनदिन सोहळा १ जून रोजी संपन्न होत आहे या कार्यक्रमासाठी जेष्ठ साहित्यिक राज्य मराठी साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते महाराष्ट्रातील साहित्यिकांना "श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार" आणि ठाणे जिल्ह्यातील साहित्यिकांना "वा. अ. रेगे साहित्य पुरस्कार" डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. तो पुढीलप्रमाणे आहे: चरित्र-आत्मचरित्र : बहुरूपीणी : अंजली कीर्तने : मनोविकास प्रकाशन. कादंबरी : जीर्णोद्धार :संतोष भलेकर : पृथ्वीराज प्रकाशन.कथा : चाहूल उद्याची : सुबोध जावडेकर :मॅजेस्टिक प्रकाशन.कविता :भातालय : नामदेव गवळी : लोकवांगमय गृह. अनुवाद : एसीएन नंबियार : वपाला बालचंद्रन, सुजाता गोडबोले : राजहंस प्रकाशन. प्रवास : पुन्हा यांकीजच्या देशात : डॉ.अच्युत बन :राजहंस प्रकाशन. पर्यावरण : वृक्ष - अनुबंध : प्रा. नीला कोरडे : मॅजेस्टिक प्रकाशन. विज्ञान : या शोधाशिवाय जीवन अशक्य : डॉ. प्रबोध चोबे : साकेत प्रकाशन. बालविभाग : मिसाईल मॅन, डॉ.एपीजे अब्दुल कलाम : एकनाथ आव्हाड : व्यास क्रिएशन. इतिहास : रॉ भारतीय गुप्तचर संस्थेची गुढगाथा : रवी आमले : मनोविकास प्रकाशन .  ललित विभागात 'चांगभलं' लेखक साहेबराव ठाणगे. ललितेतर विभाग 'कापूस' लेखक राजीव जोशी श्रीस्थानक राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार आणि वा. अ. रेगे या पुरस्कारांचा वितरण सोहळा शनिवार, दिनांक १ जून २०१९ रोजी मराठी ग्रंथसंग्रहालयाचे वा. अ. रेगे सभागृह, पहिला मजला, सरस्वती मंदिर, सुभाष पथ, जिल्हा परिषद कार्यालयासमोर , ठाणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी मराठी ग्रंथ संग्रहालयाचा १२६ वा वार्षिक समारंभ संपन्न होणार आहे. याच वेळी संग्रहालयातील उत्कृष्ट सेवक पुरस्कारांचेही वितरण करण्यात येईल.मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या १२६ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने यावर्षीपासून वाचक व साहित्यप्रेमींसाठी भव्य पुस्तक आदान-प्रदान महोत्सवाचे आयोजन मराठी ग्रंथसंग्रहालय व व्यास क्रिएशन तर्फ़े संयुक्तपणे करण्यात आले आहे. हजारो वाचकांना त्यांच्याकडील पुस्तकांच्या मोबदल्यात आहित्यिक मेजवानी असणार आहेमराठी-हिंदी-इंग्रजी भाषांमधील हजारो दर्जेदार पुस्तकांची विनामूल्य देवाण-घेवाण सर्वांसाठी खुली असणार आहे. वाचकांकडील हजारो जुन्या पुस्तकांना नवसंजीवनी देणारे व्यासपीठ सतत ३ दिवस सर्वांसाठी विनामूल्य आहे. सर्वोत्तम पुस्तकांतील उतार्‍यांचे सर्वोत्तम वाचकांकडून अभिवाचन करण्यात येईल.लोकप्रिय कवितांचे उत्स्फ़ूर्तपणे वाचकांकडून सादरीकरण करण्यात येईल. संपूर्ण ठाणे शहरात फ़िरणार पुस्तक संकलनासाठी ग्रंथकलश असणार आहे. याशिवाय नामवंत वक्ते, व्याख्याते व कलाक्षेत्रातील नामवंतांची उपस्थिती असणार आहे. कथाकथन, कविता सादरीकरण, अभिवाचन,नाट्यछटा सादर करणार्‍यांचा सन्मान करण्यात येईल. आदान-प्रदान महोत्सवातील अर्वरित पुस्तकांतून २० वृध्दाश्रमांची वाचनालये देण्यात येईल. आदान-प्रदान महोत्सवातील अतिरिक्त पुस्तके घेऊन जाण्याची ठाणे जिल्ह्यातील ग्रंथालयांना आवाहन करण्यात येईल. संपूर्ण जिल्ह्यातील वाचन चळवळीचा प्रसार यशस्वीपणे करण्यासाठी पुस्तक आदान-प्रदान महोत्सवाचे व्यासपीठ उपलब्ध करण्यात येईल.याशिवाय विविध पुस्तक प्रेमींच्या सहभागाने सजणार वाचनसंबंधित कार्यक्रमांचा सोहळा. सांस्कृतिक व साहित्यिक कार्यक्रमाचा अनमोल नजराणा असणार आहे.

पुस्तक आदानप्रदान महोत्सवाची रुपरेषा

शुक्रवार, दि ३१ मे २०१९ ( सकाळी १०.०० वा ) :- मा. श्री. राजेश नार्वेकर, जिल्हाधिकारी, ठाणे

यांच्या शुभहस्ते महोत्सवाचे उद्घाटन अध्यक्ष – डॉ. ह. शा. भानुशाली (विख्यात शल्यविशारद)

सत्र :- १

पुस्तक प्रकाशन सोहळा (सकाळी ११.०० वा) जयोस्तुते (वीर सावरकरांच्या निवडक कवितांचा भावानुवाद)

लेखिका - सौ. साधना योगेश जोशी, विशेष अतिथी- श्रीमती सुंदरबाई विश्वास सावरकर (स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्नुषा) श्रीमती आशालता राजे (स्वातंत्र्यवीर सावरकरांची नात) सूत्रसंचालन – राजेंद्र पाटणकर

सत्र :- २

पुस्तक प्रकाशन सोहळा (संध्या ६.३० वा) महाराज यशवंतराव होळकर (चरित्र) लेखक – श्री. अनंत शंकर ओगले प्रमुख पाहुणे - श्री. सच्चिदानंद शेवडे सुप्रसिध्द लेखक, व्याख्याते सूत्रसंचानल – आकाश भडसावळे

शनिवार, दि १ जून २०१९

सत्र :- ३

पुस्तक प्रकाशन सोहळा (सकाळी १०.३० वा) सोनचाफ़्याची फ़ुले, व्दितीय आवृत्ती (ललित लेख संग्रह)

लेखिका - सौ धनश्री लेले (निरूपणकार) प्रमुख पाहुणे - माधवी घारपुरे सुप्रसिध्द लेखिका, व्याख्याती

सूत्रसंचालन – स्मिता पोंक्षे

रविवार, दि २ जून २०१९

सत्र :- ४

पुस्तक प्रकाशन सोहळा (सकाळी १०.३०) मराठी नाट्यसंगीत :- स्वरूप आणि समीक्षा लेखिका ;- डॉ विजया टिळक प्रमुख पाहुणे :- प्रा विजय जोशी डॉ अनंतराव देशमुख सूत्रसंचालन :- श्री मकरंद जोशी

सत्र :- ५

अभिवाचन :- (संध्या ५.०० वा) पुस्तकाचे नाव :- मुक्काम पोस्ट १०.००

विशेष मुलाखत :- अनुरूध्द जोशी (गायक व लेखक) मुलाखतकार :- वृंदा दाभोळकर

पुस्तक प्रकाशन सोहळा (संध्या ६.०० वा) विलोरी कवडसे (ललित लेखसंग्रह)

लेखिका - डॉ अनुपमा उजगरे (जेष्ठ कवयित्री लेखिका) प्रमुख पाहुणे :- प्रा अशोक बागवे (जेष्ठ कवी, गीतकार)सूत्रसंचालन :- महेंद्र कोर्डे

समारोप :- सायं ७.३० वा

उदय निरगुडकर (जेष्ठ वाचक, विचारवंत)

दि. ३१ मे २०१९ संध्या ५.३० ते ६.३० वा अभिवाचन, काव्यवाचन व मार्गदर्शन

दि. १ जून २०१९ सकाळी ९.३० ते १०.३० वा अभिवाचन, काव्यवाचन व मार्गदर्शन

दि. २ जून २०१९ सकाळी ९.३० ते १०.३० वा अभिवाचन, काव्यवाचन व मार्गदर्शन

मार्गदर्शक :- वासंती वर्तक, श्रीरंग खटावकर, संतोष वेरूळकर, वृंदा दभोळकर व सुनिता फ़डके

सूत्रसंचालन :- दुर्गेश आकेरकर, संजीव फ़डके

Web Title: The presence of Sadanand More on the 126th anniversary of the Marathi Bookstore, on 31st May and 12th, the book exchange ceremony on June 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.