शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

अपारदर्शक कारभारावर सोशल मीडियाचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 23:39 IST

मीरा-भाईंदर महापालिका; प्रताप सरनाईक यांची आयुक्तांकडे मागणी

मीरा रोड : मीरा-भाईंदर महापालिकेमार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या कोट्यवधींच्या कामांसह झोन आणि आरक्षणबदल तसेच वृक्षतोड आदींच्या हरकती, सूचना सर्वसामान्यांपर्यंत सोडा, लोकप्रतिनिधींपर्यंतही पोहोचू नये, याची विशेष काळजी पालिका प्रशासन घेत असते. या अपारदर्शक कारभारातून सोयीच्या गोष्टी साध्य केल्या जात असल्याने आता त्यात पारदर्शकता आणण्यासाठी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी निविदा-हरकतींची माहिती सोशल मीडियासह फलकांच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध करून देण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.महापालिकेच्या विविध विभागांमार्फत कामांच्या तसेच ठेके देण्याच्या निविदा काढल्या जातात. त्याच्या वृत्तपत्रात जाहिराती काढताना कामांचे सविस्तर स्वरूप दिले जात नाही. केवळ निविदा आॅनलाइन भरणाºया संकेतस्थळावर माहिती असल्याचे नमूद केले जाते. त्याशिवाय आरक्षण आणि झोन बदलासह टीडीआर देणे, विकास आराखडा बदल, झाडांची तोड करणे याबाबत मागवण्यात येणाºया हरकती सूचनांची माहितीही केवळ एकदुसºया वृत्तपत्रात जाहिरातीद्वारे दिली जाते. पूर्वी मर्यादित वृत्तपत्रे असल्याने अशा जाहिराती निदर्शनास यायच्या; पण आता वृत्तपत्रांची संख्या खूपच वाढली आहे. दुसरीकडे लोक डिजिटल होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कामांच्या निविदा, दिले जाणारे ठेके, आरक्षण - झोन बदलासह वृक्षतोड आदींबाबतच्या हरकती-सूचनांची माहिती शहरातील सामान्य नागरिकांनाच नव्हे तर बहुसंख्य लोकप्रतिनिधींनाही कळत नाही. आपल्या परिसरात काय कामे निघाली, झाडांची तोड, आरक्षण आदी बदलांची माहिती सर्व प्रक्रिया उरकून गेल्यावर लोकांना आणि लोकप्रतिनिधींना कळते.टेंडर टक्केवारीसह विशिष्ट ठेके मिळावेत, विकासक वा राजकीय संबंध असणाऱ्यांचे भूखंड झोन-आरक्षणातून वळते व्हावेत, यासाठी हा सर्व घोटाळेबाज आटापिटा केला जातो. विशिष्ट मर्जीतले ठेकेदाराचे हित व हितसंबंध असणाºया विषयांची वाच्यता न करता गैरप्रकार साधले जातात. पालिकेचा कारभार हाकणारे ठरावीक नेते आणि अधिकारीवर्ग अर्थपूर्ण हितासाठी हे करत असतात.या घोटाळेबाज अपारदर्शक कारभाराला चाप लावण्यासाठी आ. सरनाईकांनी आयुक्त बालाजी खतगावकरांना लेखी पत्र दिले आहे. जाहीर निविदा, सूचना व हरकतींची माहिती व्यापक स्वरूपात सर्वसामान्य नागरिकांसह तसेच लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदींना कळावी, यासाठी ती पालिका संकेतस्थळ, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक आदींवर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. काढलेली कामे व ठेके याच्या जाहिराती सविस्तर तपशिलासह दिल्या जाव्यात. वृक्षतोड, आरक्षण-झोन बदलसारख्या विषयांप्रकरणी त्या-त्या भागातील नागरिकांच्या माहितीसाठी सूचना फलक लावले जावेत, अशी मागणी आ. सरनाईकांनी केली आहे.सूचना फलक लावणे बंधनकारक; ठेकेदारांवर कारवाई करा!शहरात पालिकेची जी कामे सुरू आहेत, त्याठिकाणी कामाच्या माहितीचे तर बांधकाम सुरू असणाºया ठिकाणी बांधकाम परवानगी आदींची माहिती असलेले सूचना फलक लावणे आधीपासून बंधनकारक आहे.तरीही त्याचे पालन केले जात नाही. याप्रकरणी असे कामाच्या माहितीचे फलक न लावणाºया ठेकेदारांसह विकासक व वास्तुविशारद यांच्यावर कारवाई करा, असे आयुक्तांना सांगितले आहे.

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक