शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

...तर मालमत्ताकर होणार माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 23:55 IST

किसन कथोरे : बदलापूरच्या महालक्ष्मी तलावाचे नूतनीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कबदलापूर : कुळगाव- बदलापूर नगरपालिकेला मालमत्ता करातून कोट्यवधींचा निधी मिळतो. मात्र हा निधी विकासकामांवर खर्च झालेला नसल्याचे सांगून हा निधी गेला कुठे याचा शोध घेण्याचे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले. पालिकेत भाजपची सत्ता आल्यास बदलापूरकरांना मालमत्ता करमुक्त करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

बदलापूर पश्चिमेकडील महालक्ष्मी तलावाच्या नूतनीकरण कामाचे नुकतेच कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. ते म्हणाले की, बदलापूर शहरात राहणारे बहुतांश नागरिक मध्यमवर्गीय असून मालमत्ताकरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या नागरिकांना करमुक्त करणे गरजेचे आहे. पालिकेत शिवसेनेची सत्ता होती. मात्र शहरात विकास भाजप नगरसेवकांच्या माध्यमातूनच झाला असल्याच्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएमआरडीएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने बदलापुरात सर्व रस्ते कॉंक्रिटचे झाले असल्याचे कथोरे यांनी सांगितले. बदलापूरच्या नव्या पाणीपुरवठा योजनेच्या निविदा प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून त्यामुळे लवकरच बदलापुरातील पाणी समस्याही दूर होणार असल्याची माहितीही कथोरे यांनी दिली. 

nवर्षभरापूर्वी नगरपरिषदेतील नगरसेवकांचा कार्यकाळ समाप्त झाला आहे. मात्र अजूनही भाजप नगरसेवकांच्या प्रभागात लोकांच्या दृष्टीस पडतील, अशी कामे सुरू असल्याचे राजेंद्र घोरपडे यांनी सांगितले. फक्त गटारे, पायवाटा न करता भविष्यात उपयोगी पडतील अशी लोकोपयोगी विकासकामे मंजूर करण्यासाठी ठराव मांडणे, निधी मिळवणे याचे योग्य नियोजन केल्यामुळे हे शक्य झाले असल्याचे घोरपडे यांनी स्पष्ट केले.n पूर्वी शिवसेनेचा नगरसेवक असताना महालक्ष्मी तलावाची अवस्था डबक्यासारखी होती. आता त्याला खऱ्या अर्थाने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असल्याचे सांगत घोरपडे यांनी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले. शिवसेनेच्या तुलनेत भाजप नगरसेवकांच्या प्रभागातच उद्यान, तलाव, अभ्यासिका अशी चांगल्या दर्जाची व अधिक विकासकामे झाली असल्याचा दावाही त्यांनी केला.

टॅग्स :badlapurबदलापूरthaneठाणे