शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

...तर दरदिवशी १३ लाखांचा लावला जाणार दंड, डायघर प्रकल्पाच्या ठेकेदाराला पालिकेने बजावली नोटीस

By अजित मांडके | Updated: October 3, 2023 16:59 IST

भंडार्ली येथे एक वर्षाकरीता कचरा डम्प केला जाणार होता. परंतु वर्ष उलटल्यानंतरही त्याठिकाणी आजही कचरा टाकला जात आहे.

ठाणे : भंडार्ली येथील कचरा प्रकल्प बंद करुन डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मितीचा प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. ३० सप्टेंबर पर्यंत याठिकाणी कचरा प्रकल्प सुरु होणे अपेक्षित होते. परंतु तो सुरु न झाल्याने भांडार्ली येथील स्थानिकांच्या रोषाला पालिकेला सामोरे जावे लागले आहे. असे असतांनाही पालिकेने आता २० ऑक्टोबर नंतर येथील प्रकल्प सुरु करण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु वेळेत प्रकल्प सुरु न केल्याने पालिकेच्या घनकचरा विभागाने संबधींत ठेकेदाराला नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यातही २० आॅक्टोबरनंतर प्रकल्पाच्या ठिकाणी कचरा गेला नाही तर दरदिवशी १३ लाखांचा दंड वसुल केला जाणार आहे.

भंडार्ली येथे एक वर्षाकरीता कचरा डम्प केला जाणार होता. परंतु वर्ष उलटल्यानंतरही त्याठिकाणी आजही कचरा टाकला जात आहे. येथील डम्पींग १५ सप्टेंबर पर्यंत बंद केले जाईल असे आश्वासन पालिकेने दिले होते. परंतु ३० सप्टेंबर नंतरही डम्पींग बंद झालेले नाही. त्यामुळे स्थानिकांनी दोन दिवसापूर्वी कचºयाच्या गाड्या रोखल्या होत्या. तसेच सोमवारी महापालिका आयुक्तांची भेट देखील घेतली आहे. त्यानंतर आता २५ आॅक्टोबर नंतर एकही गाडी येथे जाणार नसल्याचे लेखी आश्वासन पालिकेने स्थानिकांना दिले आहे.

परंतु दुसरीकडे डायघर प्रकल्पाचे काम रखडल्यानेच पालिकेला तारीख पे तारीख द्यावी लागत आहे. त्यामुळे काम रखडवणाºया ठेकेदाराला पालिकेच्या घनकचरा विभागाने २ ऑक्टोबर रोजी नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे. या ठेकेदाराला वाढीव ३० सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. परंतु त्यानंतरही काही तांत्रिक अडचणींमुळे या ठिकाणी प्रकल्प सुरु करता आलेला नाही. त्यातही या कचरा प्रकल्पाच्या ठिकाणी वीजेचा ट्रान्सर्फमा बसविण्यात आला आहे. जो चार्जींगवर चालणार आहे, त्यासाठी चार्जींग मिळत नसल्यानेही काहीसा विलंब झाल्याचे दिसून आले. तसेच इतरही काही तांत्रिक अडचणी आल्याचे पालिकेचे म्हणने आहे. परंतु असे असले तरी ठेकेदाराची देखील जबाबदारी होती. असे सांगत पालिकेने त्याला नोटीस बजावली आहे. त्यातही आता निर्धारीत वेळेत प्रकल्प सुरु झाला नाही तर त्याच्याकडून १३ लाखांचा दंड वसुल केला जाईल असा इशाराही पालिकेने दिला आहे.  

डायघरसाठी १४ वर्षापासून प्रयत्नडायघर प्रकल्प लवकर मार्गी लागावा यासाठी पालिका प्रशासनाचे गेल्या १४ वर्षांपासून प्रयत्न सुरु  आहेत. त्यानुसार डायघर येथे कचºयापासून वीज निर्मितीचा प्रकल्प पालिकेने राबविण्याचा निर्णय घेतला होता. या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता बांधणी, वृक्ष लागवड आण िसंरक्षक भिंतीचेही काम पूर्ण झाले आहे. येथील रहिवाशांसाठी असलेला रस्ता, प्रकल्पाच्या ठिकाणी जाणाºया रस्त्याचे कामही पूर्ण झाले आहे. तसेच या प्रकल्पात महत्वाच्या मानल्या जाणाºया मशिनचे सादरीकरण झाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीतून या मशिन येणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. आता त्या मशनीरी देखील देखील डम्पींगच्या जागी आल्याचा दावा करण्यात आला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिका