शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीतून भाईंदरमध्ये होतेय गावठी हातभट्टीच्या दारूची तस्करी 

By धीरज परब | Updated: March 23, 2024 14:25 IST

भाईंदर पोलिसांनी  ४०० लिटर गावठी हातभट्टी दारुसह दोघांना अटक केली आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - कायद्याने बंदी असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूची तस्करी भिवंडीतून भाईंदर मध्ये केली जात असल्याचे उघकीस आले असून भाईंदर पोलिसांनी  ४०० लिटर गावठी हातभट्टी दारुसह दोघांना अटक केली आहे . 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालयातील अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर आळा बसावा म्हणून आवश्यक कारवाईचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत . त्या अनुषंगाने रात्री भाईंदर पोलीस ठाण्याचे  गुन्हे प्रकटीकरण पथक हे गस्त घालत होते . त्यावेळी हवालदार  के.पी. पवार यांना त्यांच्या खबरी मार्फत माहिती मिळाली कि , एका चंदेरी रंगाच्या गाडीतून गावठी हातभट्टीची दारू मोरवा गावा च्या दिशेने जाणार आहे . 

सहायक आयुक्त दीपाली खन्ना , वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुर्यकांत नाईकवाडी, पोलीस निरीक्षक  विवेक सोनवणे व सुधीर गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नरोटे सह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे राजेश श्रीवास्तव, के. पी. पवार, के.आर. पवार,  रामनाथ शिंदे,  सुशिल पवार, संजय चव्हाण यांच्या पथकाने नेताजी सुभाषचंद्र बोस मैदाना जवळ सापळा रचला . १९ मार्चच्या मध्यरात्री चंदेरी रंगाची संशयित कार येताच तिला थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला . परंतु कार चालक कार पळवून नेण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी ती अडवली . 

पोलिसांनी कार चालका कडे चौकशी केली असता त्याने  मच्छिद्र लहु मढवी ( ४० )  रा.  अंजुरगाव,  भिवडी असे सांगितले . तर बाजूला बसलेल्याचे नाव सुरज सुनिल कोळी (२४ )  रा. अंजुरगाव,  भिवडी  असे होते . गाडीची तपासणी केली असता  डिकीमध्ये प्लास्टिकच्या पिशव्यात गावठी हातभटूटीची दारु भरलेली आढळून आली. १० गोण्या भरून एकूण ४०० लिटर गावठीहातभट्टी दारू असून तिची आणि वाहनाची मिळून किंमत २ लाख १५ हजार रुपये इतकी आहे . पोलिसांनी गावठी दारू व वाहन जप्त करून मढवी व कोळी यांना अटक करत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावठी हातभट्टीची दारू भिवंडी वरून तस्करी करून भाईंदरच्या मोरवा गावातील गावठी दारू विक्रेत्यास देण्यासाठी आरोपी आले होते . भाईंदर पोलीस अधिक तपास करत आहेत . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी