शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

शिधावाटप रास्त भाव दुकानांवर अन्नधान्याचे सुरळीत वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 23:12 IST

मुरबाडमध्ये निकृष्ट धान्याचा पोल्ट्री फार्मसाठी होत आहे वापर

सुरेश लोखंडेलोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यातील शिधावाटप दुकानांवर आता कार्डधारकाची खात्री पटवून अन्नधान्य देण्यासाठी  त्यांचे ऑनलाइन थम्ब  घेतले जात आहेत. त्यामुळे योग्य व मूळ कार्डधारकालाच अन्नधान्य मिळाल्याची खात्री होत आहे. जिल्ह्यातील या रास्त भाव दुकानांवरील अन्नधान्य पुरवठा सुरळीत व योग्य दर्जाचा होत असल्याचे आढळले. मात्र, मुरबाड तालुक्यातील शेतकरी सहकारी संघाच्या रेशनिंग दुकांनावरील अन्नधान्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे त्याचा वापर थेट पोल्ट्री फार्मसाठी केला जात असल्याचे आढळले आहे.     

राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण आदी दोन विभागांमध्ये जिल्हा प्रशासनाच्या शिधावाटप विभागाकडून अन्नधान्याचा पुरवठा रास्त भाव दुकानांना केला जात आहे. कोरोना महामारीच्या संचारबंदीत या दुकानांमधील अन्न धान्य पुरवठ्यावर नागरिकांना आपला उदरनिर्वाह करणे शक्य झाले. जिल्ह्याच्या शहरी भागात सात लाख १७ हजार ४८ हजार  या अंत्योदय कार्डधारकांना दरमहा ३५ किलो अन्नधान्याचे वितरण होत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात गहूऐवजी तांदूळ मोठ्या प्रमाणात वापरत आहे. यामुळे या ३५ किलो अन्नधान्यामध्ये २५ किलो तांदूळ आणि १० किलो गहू या अंत्योदय कार्डधारकास वितरण केले जात आहे. यामध्ये तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलोने या ग्राहकांकडून गव्हाची खरेदी केली जात आहे. या प्रमाणेच प्राधान्यक्रमाच्या कार्डधारकांना दरमहा प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दिले जात आहे. 

शेतकरी सहकारी संघाला निकृष्ट दर्जाचे अन्नधान्यजिल्ह्याच्या ग्रामीण भागात बहुतांशी ठिकाणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनव्दारे रेशनिंग दुकानांवरही ग्रामस्थांना अन्नधान्य वितरण केले जात आहे. यामध्ये मुरबाड तालुक्यातील काही दुकानांमध्ये वितरित करण्यात येणारे अन्नधान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळले आहे. त्यामुळे कार्डधारकांकडून या अन्नधान्याची खेरदी केली जात नाही. त्यामुळे मुरबाड तालुका शेतकरी सहकारी संघाच्या या रेशनिंग दुकांनांवरील अन्नधान्य सध्या पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांसाठी वापरले जात असल्याचे या सहकारी संघाचे सेल्समन जे. एस. घुडे यांनी निदर्शनात आणून दिले आहे. 

nयामध्ये तीन रुपये दराने तीन किलो तांदूळ व दोन किलो गहू प्रति किलो दोन रुपये दराने वितरण केले जात आहे. nया पाहणीमध्ये बहुतांशी शिधावाटप विभागाच्या रास्त भाव  दुकानांवर चांगल्या दर्जाचे अन्नधान्य वाटप केले जात आहे.nत्यामुळे अंत्याेदय व प्राधान्यक्रम कार्डधारकांकडून त्यांचा लाभ घेतला जात आहे.

शिधावाटप दुकानांवर उत्तम दर्जाचे अन्नधान्याचे वितरण जिल्ह्यातील रास्तभाव दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना आमच्याकडून अन्नधान्यपुरवठा केला जात आहे. एफसीआयव्दारे आम्हाला या अन्नधान्याचा पुरवठा होत आहे. अन्नधान्य उत्तम दर्जाचे जिल्ह्यातील दुकानांवर वितरण केले जात आहे. एखादी गोणी किंवा पोत्यातील गहू, तांदूळ खराब निघाले तर आम्ही त्या बदल्यात दुकानदारास उत्तम दर्जाचे दुसरी गोणी किंवा पोते देतो. पण कार्डधारकास उत्तम दर्जाचे गहू, तांदूळ जिल्ह्यात पुरवठा केला जात आहे. आम्ही पुरवठा केलेले अन्नधान्य पोल्ट्री फार्मला वाटप केले जात नाही, तसे आढळून आल्यास दुकानदारांवर त्वरित कडक कारवाई करण्यात येईल.    - राजू थोटे, जिल्हा पुरवठा अधिकारी, ठाणे 

टॅग्स :thaneठाणे