शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

धूम्रपान करणारी युगुले लावतात आग, येऊरचा वणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2018 03:12 IST

येऊरच्या जंगलात आठवडाभरात दोनवेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून येथे पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी किंवा आडोशाला बसून प्रेमालाप करतानाच धूम्रपान करणारी जोडपी यांच्या बेफिकिरीतून आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : येऊरच्या जंगलात आठवडाभरात दोनवेळा आग लागण्याच्या घटना घडल्या असून येथे पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी किंवा आडोशाला बसून प्रेमालाप करतानाच धूम्रपान करणारी जोडपी यांच्या बेफिकिरीतून आग लागण्याच्या घटना घडत असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याखेरीज, प्राण्यांची शिकार करणारे शिकारी सावज जाळ्यात येण्याकरिता हेतुत: आग लावतात, असेही निदर्शनास आले आहे.संजय गांधी राष्टÑीय उद्यान, येऊरचे जंगल आणि शहापूर, मुरबाड तालुक्यांतील अभयारण्यात पार्ट्या करण्याकरिता जाणारी तरुणांची टोळकी धूम्रपान करून थोटके वाळलेल्या गवतावर बिनदिक्कत फेकून देतात. याखेरीज, एकान्तवासाकरिता येथे येणाºया प्रेमीयुगुलांकडूनही धूम्रपान केले जाते आणि आग लागते. अनेक तरुणतरुणी येऊरच्या परिसरात एकान्तात जाऊन प्रेम करण्याबरोबरच धूम्रपान करतात, असे निदर्शनास आले आहे. सिगारेट पेटवल्यावर सहजपणे फेकून दिलेली काडी किंवा अर्धवट जळालेली सिगारेट सुकलेल्या गवतावर टाकल्याने जंगलातील वणव्याच्या घटना वाढत असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे. येऊरच्या जंगलात जाऊन सशासारख्या प्राण्यांची शिकार करून मांस-मदिरेवर ताव मारण्याचे प्रकार वाढले आहेत. ससे पकडण्याकरिता ससा लपून बसलेल्या गवताला हेतुत: आग लावली जाते. यामुळे भयभीत झालेला ससा बाहेर येतो व मग त्याला मारले जाते. शिकारीकरिता लावलेली आग काहीवेळा हवेमुळे पसरते व मोठ्या प्रमाणावर वृक्ष व वनसंपदेची हानी करते, असे वनविभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.येऊरच्या जंगलातील ‘गोल्डन फार्म कण्ट्री’च्या जवळपास शनिवारी दुपारी वणवा पेटला. दोनचार दिवसांपूर्वी मुलुंड परिसरातील पाइपलाइनजवळ पडलेल्या ठिणगीतून संजय गांधी राष्टÑीय उद्यानाच्या परिसरात वणवा पेटून शेकडो वृक्ष जळून खाक झाले. मुंबई, ठाण्याच्या आसपास असलेल्या जंगलातील वणव्याच्या धुराच्या लोटांमुळे ठळक बातम्या होतात. मात्र, शहापूरच्या भातसा, तानसा अभयारण्यात व मुरबाड, माळशेजच्या जंगलात पर्यटकांच्या बेपर्वाईमुळे गेल्या काही दिवसांपासून वणव्याच्या घटना घडत आहेत. मागील दोन महिन्यांत वणव्याच्या शेकडो घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. कडकडीत उन्हामुळे झाडांचा पालापाचोळा, गवत वाळलेले आहे. त्यावर एक ठिणगी पडण्याचा अवकाश लागलीच आग प्रज्वलित होते. आग लागल्यावर जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळणाºया प्राण्यांच्या पावलांसोबत आग अन्यत्र पसरते. मुरबाड, शहापूर आदी भागांत गेल्या काही वर्षांत रिसॉर्ट, बंगले यांचे पेव फुटले आहे. तेथे वरचेवर पार्ट्यांकरिता मुंबई, ठाण्यातून पर्यटक जातात. शिकार करून मांस खाण्याकरिता शिकारी बिनधास्त आग लावून मोकळे होतात. भातशेती करणाºया शेतकºयांकडून राबसाठी शेती जाळण्यात येते. यातील ठिणगी उडून वणवा लागतो, अशी माहिती वन्यजीव प्राणी संरक्षक अधिकारी ईशांत कांबळी यांनी सांगितले.हवा खायला येणाºयांचेही प्रबोधन हवेरात्रीबेरात्री जंगलात धूर दिसताच वनअधिकारी येऊरच्या जंगलात धाव घेतात. मात्र, जोपर्यंत पार्टी करणाºया पर्यटकांना आवर घातला जात नाही, तोपर्यंत आग लागण्याच्या घटना घडणारच, असे वनीच्यापाड्यातील रहिवासी लक्ष्मण खंडारे व पाटीलपाड्यातील नरेश मोरगे यांनी सांगितले. वनअधिकारी जंगल परिसरात असलेल्या पाड्यांच्या रहिवाशांमध्ये वणवा लागू नये व लागल्यास तो रोखण्याबाबत जनजागृती करत असल्याचे खंडारे यांनी सांगितले. शहरातून जंगलाची हवा खाण्यासाठी येणाºयांमध्येही जनजागृती करण्याची गरज असल्याचे नितेश पांचोली यांनी सांगितले. सुदैवाने आतापर्यंत वणव्यात वन्य प्राण्यांचा जीव गेला नाही, असे पांचोली यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे