शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
2
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
3
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
4
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
5
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
6
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
7
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
8
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
9
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
12
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
15
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
16
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
18
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
19
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
20
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का

जेव्हा अनाथ मुलींच्या चेह-यावर हसू उमटतं..., १०० अनाथ मुलींचं अनोखं बर्थडे सेलीब्रेशन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 15:48 IST

ठाण्यातील बेघर मुलांना आश्रय देणारी माँ निकेतन ही सेवाभावी संस्था आणि आय लीफ रिट्ज या आलिशान पार्टी हॉलचे मराठमोळे संचालक एकत्र येऊन तब्बल १०० बेघर, अनाथ मुलांचा वाढदिवस साजरा केला.

ठळक मुद्दे१०० अनाथ मुलींचं अनोखं बर्थडे सेलीब्रेशन मुलींच्या चेह-यावर सुंदर उमटलं हसू आयलीफ रिट्झ बॅंक्वेटमध्ये हे अनोखं बर्थडे सेलीब्रेशन रंगलं

ठाणे : वाढदिवस म्हटला की, केकवरची मेणबत्ती फुंकर घालून विझवणं, फुगे फोडणं, बर्थडे गीत गाणं आलंच. आपल्या लेकीच्या वाढदिवसाला काय करू अन् काय नको, असं आईवडिलांना होतं. पण ज्या मुली आईवडिलांशिवायच अनाथालयामध्ये लहानाच्या मोठ्या होत असतील त्यांचे काय? त्यांचा वाढदिवस कधी आनंदात, जल्लोषात साजरा होत असेल काय? नेमका हाच विचार करून ठाण्यातील 'मा निकेतन' ही सेवाभावी संस्था आणि 'आयलीफ रिट्झ' बॅंक्वेट्स यांनी सोमवारी एकाचवेळी तब्बल १०० मुलींचा वाढदिवस अत्यंत शानदारपणे साजरा केला. त्यामुळे या मुलींच्या चेह-यावर सुंदर हसू उमटलं.  ठाण्यातील घोडबंदर रोडवरच्या आयलीफ रिट्झ बॅंक्वेटमध्ये हे अनोखं बर्थडे सेलीब्रेशन रंगलं तेच मुळी शेकडो फुगे, संगीत, विविध खेळ, भेट वस्तू आणि छोटा भीम या कार्टून कॅरॅक्टरच्या साक्षीने. बर्थडे केक म्हणून आणलेला भलामोठा केक पाहून या मुली आश्चर्यचकीतच झाल्या. बर्थडे केक कापताना सर्वांनी मनसोक्त सेल्फी- फोटोसुद्धा काढून घेतले. मा निकेतनमधली १० वर्षांची पूजा म्हणाली, "छोटा भीमला मिठी मारताना आणि त्याच्यासोबत नाचताना मला खूपच आनंद झाला. यापूर्वी मी इतका सुंदर,आलिशान पार्टी हाॅल कधीही पाहिला नव्हता. माझा वाढदिवस इतक्या सुंदर पद्धतीने साजरा केला जाईल,अशी मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती." 

"आयलीफ रिट्झ बॅंक्वेट गेल्या वर्षी सुरू केल्यानंतर वर्षभरात आम्ही अनेक शानदार, आलिशान सोहळे आयोजित केले. पण आमच्या प्रथम वर्षपूर्तीच्या निमित्ताने आज या १०० अनाथ मुलींचा साजरा केलेला वाढदिवस खरोखरच आनंददायी होता. ज्यांना बर्थडे पार्टी माहीत नाही, अशा या मुलींसाठी ही अनोखी बर्थडे पार्टी आयोजित करण्याची मजा खूपच निराळी होती", असं मत आयलीफ रिट्झ बॅंक्वेटचे व्यवस्थापकीय संचालक प्रतीश आंबेकर यांनी व्यक्त केले. मा निकेतनच्या विश्वस्त सिस्टर अम्रिता म्हणाल्या, "आयलीफ रिट्झ बॅंक्वेटच्या आमंत्रणाच्या निमित्ताने या मुलींचा वाढदिवस प्रथमच संस्थेच्या बाहेर साजरा झाला. एखाद्या भल्यामोठ्या पार्टी हाॅलमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा होणं म्हणजे त्यांच्यासाठी एक स्वप्नपूर्तीच आहे." 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईSocialसामाजिक