शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

चापट मारणे बेतले तरुणाच्या जीवावर, क्षुल्लक वादातून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 03:08 IST

कल्याण : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात चापट मारली म्हणून रागाच्या भरात १६ वर्षांच्या मुलाने आणि त्याच्या बापाने २२ वर्षांच्या तरुणाची हत्या केल्याची घटना येथील पूर्वेकडील नेतिवली, सूचकनाका परिसरात बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली.

कल्याण : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात चापट मारली म्हणून रागाच्या भरात १६ वर्षांच्या मुलाने आणि त्याच्या बापाने २२ वर्षांच्या तरुणाची हत्या केल्याची घटना येथील पूर्वेकडील नेतिवली, सूचकनाका परिसरात बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. या हत्येप्रकरणी बापलेकाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.सूचकनाका, रामनगर भागात राहणाºया आफताब आलमयार महमद खान ऊर्फ बबलू (वय २२) याचे त्याच परिसरात राहणाºया १६ वर्षांच्या मुलाबरोबर क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. या वादात आफताब याने त्या अल्पवयीन मुलाच्या गालावर चापट मारली होती. ही बाब मुलाने आपल्या वडिलांना सांगितली. याचा जाब विचारण्यासाठी अल्पवयीन मुलगा आणि वडील कलिम करमुद्दीन शेख यांनी आफताबला रस्त्यात गाठले. या वेळी कलिम आणि आफताबमध्ये जोरदार वाद झाला. यात कलिम आणि त्यांच्या मुलाने आफताबला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आफताबला ठोशाबुक्कयांनी मारहाण करताना यात त्याच्या गुप्तांगावर प्रहार केल्याने आफताबचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सूचकनाका, रामनगर भागातील एस.के. ट्रेडर्स या दुकानाजवळच घडला.याप्रकरणी असदअली खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी बापलेकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, गुन्हा घडल्यानंतर आरोपी बाप आणि लेक हे दोघेही स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले.

टॅग्स :thaneठाणे