शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मिडियावर बदनामीकारक फोटो आणि मजकूर व्हायरल: मकरंद अनासपुरेंची पोलीस ठाण्यात धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 22:25 IST

आपल्या विनोदी भूमीकेमुळे संपूर्ण महाराष्टÑभर लाखो चाहते असलेल्या मकरंद अनासपुरे यांच्या छायाचित्रांशी छेडछाड करुन बदनामीकारक मजकूर टाकल्याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तांत्रिक बाबींचा अभ्यास करुन यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ठळक मुद्देकासारवडवली पोलीस ठाण्यात केली तक्रारगेल्या वर्षभरापासून सुरु होता प्रकारफेसबुकवर फोटो मॉर्फ करुन बदनामीकारक मजकूर केला व्हायरल

ठाणे: सोशल मिडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध विनोदी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची बदनामी करणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे. स्वत: अनासपुरे यांनीच याप्रकरणी ही तक्रार दाखल केली असून यातील आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे पोसिलांनी सांगितले.ठाण्यातील घोडबंदर रोड येथील रहिवाशी असलेले सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांचे मुंबई ठाण्यासह राज्यभर अनेक चाहते आहेत. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या छायाचित्रांना मॉर्फ (संपादित करुन) फेसबुकवर वादग्रस्त मजकूर व्हायरल करण्यात आला. या मजकूराशी वास्तवाशी आणि अनासपुरे यांच्याशी कोणताही संबंध नसल्यामुळे तसेच तो विनोदी मजकूर असल्यामुळे अनासपुरे यांनीही त्याला फारसे महत्व दिले नाही. परंतु, मार्च ते जुलै २०१९ या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये राजकीय स्वरु पाचा तसेच समाजामध्ये अनासपुरे यांच्याबद्दल गैरसमज आणि तिरस्कार निर्माण करणारा मजकूर फेसबुकद्वारे प्रसारित होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यावेळी हा प्रकार गांभीर्याने घेत याप्रकरणी २ आॅगस्ट रोजी कासारवडवली पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

‘‘ फेसबुकवर मकरंद अनासपुरे यांचे मॉर्फ केलेले फोटो टाकून त्यामध्ये बदनामीकारक मजकूर टाकल्याची त्यांची तक्रार आहे. याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.’’पंकज शिरसाठ, सहायक पोलीस आयुक्त, वर्तकनगर विभाग, ठाणे 

 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे