शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळला; बालिकेसह तीन ठार, दोन जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 17:06 IST

इमारतीच्या दुसऱ्या मजल्याचा स्लॅब कोसळल्याने पहिल्या मजल्यावरील स्लॅबही खाली आला.

- सदानंद नाईक

उल्हासनगर : कॅम्प नं- 3 गुरुद्वार परिसरातील मेमसाहेब इमारतीमधील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान कोसळून तिघांचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले. महापालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले असून इमारत खाली करण्यात आली आहे.

 

उल्हासनगरात धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून इमारतीचा स्लॅब कोसळून अनेक जणांचे बळी गेले आहेत. हिराघाट गुरुद्वारा जवळील पाच मजल्याची मेमसाहेब इमारतीमधील दुसऱ्या मजल्याचा स्लॅब पहिल्या व तळमजल्याच्या क्लिनिकवर कोसळून एकच हाहाकार उडाला. इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती स्थानिक लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्लॅब खाली अडकलेल्याना बाहेर काढण्याचे काम सुरू केले.  नितु साजिदा (60), अर्पिता मोर्या (25), प्रिया मोर्या (2) अश्या तिघांचा मृत्यू झाला. साई आशीर्वाद क्लिनिकचे डॉ. रिजवानी यांच्यासह दोन जण जखमी झाले असून जखमींची आकडा वाढण्याची शक्यता आहे.

महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी स्लॅब खाली अडकलेल्याना त्वरित बाहेर काढले. सुरक्षेचा उपाय म्हणून मेमसाहेब इमारत खाली करून फ्लॅटधारकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. आहे. इमारत पाच मजल्याची असून इमारतीत एकूण 15 फ्लॅट व 5 दुकाने आहेत. स्लॅब कोसळला त्यावेळी साई आशीर्वाद क्लिनिक सुरू होते.

 

 

 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरthaneठाणे