शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पालकांच्या खिशाला बसली कात्री, वह्या अन् पाठ्यपुस्तकांच्या किमतीत २० ते ३० टक्के वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:28 IST

वह्या, पाठ्यपुस्तके महागली : किमतीत २० ते ३० टक्के वाढ, खरेदीसाठी उडाली झुंबड

ठाणे : जून महिना उजाडताच पावसाबरोबरच शाळेचेही वेध लागतात. त्यामुळे शालेय खरेदीसाठी पालक आणि विद्यार्थ्यांची दुकानांमध्ये झुंबड उडत आहे. कागदाचे दर वाढल्यामुळे यंदा शालेय वह्या आणि अभ्यासक्रम बदललेल्या इयत्ता दुसरी आणि अकरावीच्या पाठ्यपुस्तकांना बसला आहे. वह्यांचे दर २० ते ३० टक्क्यांनी, तर पुस्तके दीड पटीने महागली आहेत.

यावर्षी छोट्या वह्यांची किंमत २० टक्क्यांनी तर मोठ्या वह्यांची किंमत ३० टक्क्यांनी वाढली आहे. गतवर्षी छोट्या वह्यांचे दर २८ ते ३५ रुपये होते. यंदा ही किंमत ३५ ते ४५ रुपयांवर गेली आहे. मोठ्या वहीची किंमत ४० ते ५८ रुपयांवरून ४८ ते ६५ रुपयांवर गेली आहे. रंगांच्या साहित्यामध्ये दरवर्षी १० टक्के वाढ होते. यंदाही यात १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यंदा इयत्ता दुसरी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलला आहे. शासनाकडून येणाऱ्या इंग्रजी व मराठी माध्यमांच्या गणित, इंग्रजी आणि मराठी या विषयांच्या पुस्तकांचे दर वाढले आहेत. गेल्या वर्षी इयत्ता दुसरीच्या इंग्रजी माध्यमाच्या गणित, इंग्रजी, मराठी या तीन पुस्तकांचा दर ९७ रुपये तर मराठी माध्यमाच्या तिन्ही विषयांच्या पुस्तकांचा दर ९९ रुपये होता. यंदा दुसरी इयत्तेचे शासनाकडून येणारे इंग्रजी माध्यमाचे मराठी या विषयाचे पुस्तक अद्याप आले नसले तरी मराठी माध्यमाचे इंग्रजी या विषयाचे पुस्तक उद्यापासून बाजारात उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी ८०० ते ९०० रुपये दराने मिळणारे गाइड्स हे यंदा दुपटीने म्हणजे १५०० ते १६०० रुपये दरांनी मिळत असल्याचे मंदार मेहेंदळे यांनी सांगितले.इयत्ता दुसरीच्या पुस्तकांचे वाढलेले दरइंग्रजी माध्यम मराठी माध्यमविषय आधीचे दर आताचे दर आधीचे दर आताचे दरइंग्रजी ३३ ५१ ३३ ४२गणित ३३ ५३ ३३ ५३मराठी ३१ - ३३ ५१पावसामुळे ओसरली खरेदीची गर्दीतीन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्याने शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी येणाºया विद्यार्थी आणि पालकांची गर्दी ओसरली आहे, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. साधारण दुपारनंतर खरेदीसाठी गर्दी होते. ही गर्दी पावसाने थोपवून धरली आहे. सोमवारी शाळेचा पहिला दिवस असल्याने शनिवार-रविवारी गर्दी होण्याची दाट शक्यता असल्याचे मेहेंदळे यांनी सांगितले.दरवर्षी दोन इयत्तांचा अभ्यासक्रम बदलत असतो. गेल्या वर्षी पहिली आणि आठवी इयत्तेचा अभ्यासक्रम बदलला होता. यंदा इयत्ता दुसरी आणि अकरावी इयत्तांचा अभ्यासक्रम बदलला आहे.- मंदार मेहेंदळे, बुक स्टॉलचे मालक

टॅग्स :thaneठाणेSchoolशाळा