शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

सहावी मार्गिका होणार २०२० अखेरीस पूर्ण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2019 00:30 IST

मुंबापुरीची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक पंधरवड्यापासून विविध तांंत्रिक कारणांनी कोलमडल्याने ठाणे जिल्ह्यातील २० लाख प्रवाशांना त्याचा फटका बसला.

- अनिकेत घमंडीमध्य रेल्वेच्या तांत्रिक बिघाडामुळे ठाणे जिल्ह्यातील लाखो प्रवाशांचे हाल होत आहेत, त्याचे काय?अनेकदा सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाडाची समस्या उद्भवते. याशिवाय कर्जत, कसारा मार्गावर म्हशींसह अन्य प्राणी रेल्वे मार्गात येतात. अनेकदा गर्दीच्या रेल्वे स्थानकांमध्ये रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांचा अपघात होतो, तर कधी चेन पुलींग केले जाते. त्यामुळे लोकल थांबली की, ती पुन्हा सुुरु व्हायला ४ मिनिटे लागतात. त्यामुळे लोकलचे ‘बंचिंग’ होते. हिवाळ्यात, पावसाळ्यात रुळांना तडा जातो. त्याची कामे तातडीने करावी लागतात. अशा नानाविध कारणांनी मध्यरेल्वेची उपनगरिय लोकल सेवा प्रभावित होते. त्याचा परिणाम साहजिकच वेळापत्रकावर होतो. बरेचदा तांत्रिक समस्यांमुळे लोकलसेवा विस्कळीत होते. पँटोग्राफची समस्याही अधुनमधून उद्भवते. मध्य रेल्वे सीएसएमटी ते कसारा १०७ किमी, कर्जत मार्गावर ९५ किमी, तर खोपोलीपर्यंत १२० किमी धावते. लांबच्या प्रवासात अनेक अडचणी येतात. पण तरीही अपवाद वगळता लोकल सेवा अखंड सुरु असते. मध्य रेल्वेमधून प्रतीदिन ४२ लाख ५० हजार प्रवासी मुख्य, हार्र्बर आणि ट्रान्स हार्बर मार्गावर प्रवास करतात. दिवसाला १७७२ लोकल फेºया करणारी देशभरामध्ये सगळ्यात मोठी उपनगरिय रेल्वे सेवा अशी मध्य रेल्वेची ख्याती आहे.पावसाळ्यात रेल्वेसेवा ठप्प होऊ नये, यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत?सगळ्यात जास्त समस्या पावसाळ्यात भेडसावतात. मध्य रेल्वेच्या मुख्य आणि ट्रान्सहार्बर भागामध्ये बहुतांश ठिकाणी खाडीकिनारा आहे. त्यातच ठाणे जिल्ह्यात, प्रामुख्याने ठाणे ते कल्याण भागामध्ये रुळालगतच खाडी आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये समुद्राच्या भरती, आहोटीनुसार पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. सायन, कुर्ला, हार्बरला काही भागात, तसेच कळवा आदी ठिकाणी जमिनीच्या सखल भागात रेल्वे रुळावर पाणी साचण्याच्या समस्या उद्भवतात. मात्र आता त्या ठिकाणी पाणी तुंबू नये आणि रेल्वे सेवा प्रभावित होऊ नये यासाठी परेल, माटुंगा, सायन आदी ठिकाणी रेल्वे रुळांची उंची ५ इंचापर्यंत वाढवण्यात आली आहे. मानखुर्द स्थानकातदेखील रुळांची उंची ५ इंचांनी वाढवण्यात आली आहे. लोकलसेवा वेळेत चालवण्यासाठी विशेष स्टाफची निर्मिती केली आहे. सीएसएमटी, कुर्ला, ठाणे, कल्याण आदी स्थानकांत हे विशेष कर्मचारी लोकल सेवा का वेळेत धावत नाही, याची पाहणी करतील आणि समस्या निर्माण झाल्यास त्यावर काय तोडगा काढायचा, यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा करतील. रेल्वे रुळांमध्ये तुंबलेले पाणी बाहेर काढण्यासाठी सुमारे ९७ ठिकाणी वॉटर पंप लावण्यात आले असून ते चांगल्या क्षमतेचे आहेत.ठाणे जिल्ह्यातील लोकल फेºया कधी वाढणार?५/६ व्या रेल्वे लाइनचे काम प्रगतिपथावर असून कल्याण ते दिवा, तसेच ठाणे ते कुर्ला मार्गावर काम पूर्ण झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ठाणे-दिवा मार्गावर हे काम सुरु आहे. पण गतवर्षीपासून या कामाने जोर धरला असून, दिवा, मुंब्रा, कळवा रेल्वे मार्गावर विशेषत: धिम्या दिशेकडे झालेले मोठे बदल प्रवासी रोज बघतच आहेत. खाडी मार्गातून काम करताना अनेक अडथळे येतात, पण तरीही त्यावर मात करून काम पुढे सरकत आहे. मात्र जोपर्यंत ५/६व्या मार्गाचे काम पूर्ण होत नाही, तोपर्यंत लोकल फेºया वाढवण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या १७७२ फेºया आहेत, त्या वेळेत कशा धावतील, यावरच भर देण्यात येणार आहे. ते कामदेखील २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. कल्याण-कसारा मार्गावर तिसºया लाइनचा प्रकल्प प्रगतिपथावर असून तो केंद्राकडून मंजूर झाला आहे. आगामी काळात रेल्वे पादचारी पूलांची नवनिर्मिती, जुन्या पुलांची डागडुजी, एस्केलेटर, स्वच्छतागृह अशा विविध सुविधाही टप्प्याटप्प्याने दिल्या जातील.मुंबापुरीची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेच्या लोकलचे वेळापत्रक पंधरवड्यापासून विविध तांंत्रिक कारणांनी कोलमडल्याने ठाणे जिल्ह्यातील २० लाख प्रवाशांना त्याचा फटका बसला. आधीच बेरोजगारीचा प्रश्न पेटलेला असताना, लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने आहेत त्या नोकºया टिकवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. चाकरमान्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी लेटमार्क, तसेच संध्याकाळी घरी परतण्यास प्रचंड यातनांना सामोरे जावे लागत असून, विद्यार्थ्यांनाही महाविद्यालयासाठी विलंब होत आहे.विशेषत: ठाणे जिल्ह्यात रेल्वे समांतर रस्त्याची बोंब आहे. जलवाहतुकीचा पर्याय कागदावर असून, बहुतांश रस्ते वाहतूककोंडीत अडकले आहेत. रेल्वे व्यतिरिक्त वाहतुकीचे सर्वच पर्याय खर्चिक आणि वेळखाऊ असल्याने विचित्र कोंडीत आणि कात्रीत अडकलेल्या प्रवाशांना कोणीही वाली नसून, त्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. रोज मरे त्याला कोण रडे, अशी स्थिती प्रवाशांची असून, पावसाळा आला की या समस्यांमध्ये आणखी भर पडते.या दिवसांमध्ये आबालवृद्धांना रेल्वे प्रवासाच्या नावाने अक्षरश: धडकी भरते. पण यंदा मध्य रेल्वे प्रशासनाने लोकल वेळेवर धावावी, पावसाळ्यात रुळांमध्ये पाणी तुंबू नये यासाठी काही पावले उचलली आहेत. रेल्वे प्रवाशांना अखंड सेवा मिळावी, यासाठी रेल्वेने केलेल्या उपाययोजनांची माहिती मध्य रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी डॉ. ए. के. सिंग यांनी ‘लोकमत’ला दिली.

टॅग्स :central railwayमध्य रेल्वे