शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सोळा हजार शिक्षकांच्या गैरहजेरीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 03:00 IST

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे.

ठाणे : ठाणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. परंतु विनाअनुदानित शाळांचे १६ हजार शिक्षक अद्यापही निवडणुकीच्या कामात सहभागी झाले नसल्याची बाब समोर आली आहे. या विनाअनुदानित शाळांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, बुधवारी त्यावर सुनावणी होणार आहे. हे शिक्षकनिवडणूक कामास मिळाले नाही, तर निवडणूक विभागापुढे निवडणुकीचे कामकाज हातळण्याचे मोठे आव्हान उभे राहणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यानुसार मंगळवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. निवडणुकीचे कामकाज पाहण्यासाठी ६० हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु त्यातून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना आधीच वगळण्यात आले असल्याने, आता निवडणूक विभागाकडे ४८ हजारांच्या आसपास ताफा शिल्लक राहिला आहे. त्यातूनही या कामासाठी अद्याप काही लोकांनी हजेरी लावली नसल्याने अशांना नोटीसासुध्दा बजावण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान, याकामी महापालिका, जिल्हापरिषद, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनाही पाचारण करण्यात आले आहे. परंतु विनाअनुदानित शाळांमधील तब्बल १६ हजारांच्या आसपास शिक्षकांनी अद्यापही या कामासाठी हजेरी लावलेली नाही. आम्ही शासनाचा भाग येत नसल्याने, या कामातून आम्हाला वगळण्यात यावे, या मागणीसाठी विनाअनुदानित शाळांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या शाळा विनाअनुदानित असल्या, तरी त्यांमधील शिक्षकांना शासनाच्या नियमानुसारच वेतन अदा होत असते, त्यांना ज्या सोयीसुविधा मिळतात, त्या शासनाच्या योजनांमधूनच मिळत असतात. एखाद्या शिक्षकावर अन्याय जरी झाला, तर तो शासनाकडेच धाव घेत असतो. त्यामुळे या राष्टÑीय कामात त्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

शिक्षकांना केवळ ३० तासांचे निवडणूक काम असते. तेही करण्यास शिक्षक नकार देत असतील, तर चुकीचे असल्याचेही जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे. निवडणुकीच्या कामकाजातून अत्यावश्यक सेवेतील सुमारे ८५०० कर्मचाऱ्यांना आधीच या कामातून मुक्त करण्यात आले आहे. त्यात या १६ हजार शिक्षकांनी असहकार पुकारला, तर निवडणुकीच्या कामकाजावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.निवडणूक कामाला दांडी मारणाºया ५ हजार ४०० कर्मचाºयांना नोटिसाच्लोकसभा निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज असले, तरी निवडणुकीचे कामकाज करण्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ अद्यापही उपलब्ध होत नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे निवडणुकीच्या कामाला गैरहजर राहणाºया ५ हजार ४०० जणांना जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. तरीही हजर न राहिल्यास निवडणूक कायद्याअंतर्गत प्रशासकीय आणि फौजदारी कारवाईही करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली.च्ठाणे जिल्ह्णात आता खºया अर्थाने लोकसभेची धामधुम सुरु झाली आहे. त्यानुसार निवडणूक यंत्रणा यासाठी सज्ज झाली आहे. निवडणुकीच्या कामासाठी ६० हजारांच्या आसपास कर्मचाºयांची आवश्यकता आहे. ठाणे जिल्ह्यात ६ हजार ४८८ मतदान केंद्रे असून १ जानेवारी २०१९ च्या अंतिम मतदारयादीप्रमाणे ६० लाख ९३ हजार ८७ मतदार आहेत.च्निवडणूक कामासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाºयांमध्ये २०० व्हिडीओग्राफर, ७२ भरारी पथके, ८६७ झोनल अधिकारी आणि तितकेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवणारे अधिकारी असणार आहेत.च्यंदाच्या निवडणुकीसाठी मतदारसंख्या तसेच मतदानकेंद्राचीही संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता आहे.च्जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातील अधिकारी, कर्मचाºयांसह शासकीय व निमशासकीय कर्मचाºयांना निवडणुकीच्या कामाचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु अनेक अधिकारी आणि कर्मचारी या कामासाठी आजही हजर झालेले नाहीत. अशा कामचुकार ५ हजार ४०० अधिकारी, कर्मचाºयांना जिल्हा निवडणूक विभागाने नोटिसा बजावल्या आहेत. 

टॅग्स :ElectionनिवडणूकTeacherशिक्षकthaneठाणे