शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! भिवंडीत सहा वर्षीय चिमुरडीची हत्या; मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून आरोपी फरार 

By नितीन पंडित | Updated: September 15, 2023 18:14 IST

शुक्रवारी परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर ही दुर्दैवी घटना समोर आली आहे.

भिवंडी: एका सहा वर्षीय चिमुरडीची हत्या करून मृतदेह प्लास्टिकच्या बादलीत कोंबून आरोपी फरार झाल्याची घटना शहरातील फेणेगाव धापसी पाडा परिसरातील एका पत्र्याच्या चाळीत घडली आहे. शुक्रवारी परिसरात दुर्गंधी पसरल्यानंतर ही दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हत्या झालेल्या मुलीचे आई-वडील हे दोघेही गोदामामध्ये काम करण्यासाठी जातात. १३ सप्टेंबर रोजी आई-वडील कामासाठी घरातून निघून गेले होते. हत्या झालेल्या सहा वर्षीय मुली सोबत तिचा नऊ वर्षाचा भाऊ घरी होता.चिमूरडी सकाळ पासूनच बेपत्ता असताना सायंकाळी आई वडील घरी आल्यानंतर मुलाने बहीण दिसत नसल्याची माहिती आई वडिलांना दिली. त्यानंतर आई-वडिलांनी परिसरात शोध घेत रात्री उशिरा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात मुलीच्या हरवल्याची नोंद केली. मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून शोध घेण्यास सुरवात केली होती. नजीकच्या वऱ्हाळा तलावामध्ये सुद्धा पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले होते.मात्र चिमुरडीचा शोध लागला नव्हता.

शुक्रवारी दुपारी परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिल्यानंतर भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे व पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसरात शोध घेतला असता एका चाळीतील बंद असलेल्या खोली मध्ये प्लास्टिकच्या बकेट मध्ये मुलीचा मृतदेह कोंबून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी तात्काळ घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुंबई येथील जे जे रुग्णालयात रवाना केला आहे.

घटनस्थळी ठाणे येथील ठसे तज्ञ पथक सुध्दा दाखल झाले असून, भिवंडी शहर पोलिस ठाण्यात कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारी वरून हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेह शवविच्छेदन अहवालामध्ये ज्या गोष्टी समोर येतील त्यानुसार गुन्ह्याची व्याप्ती वाढवली जाईल असे सांगत आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तीन पथके ठिकठिकाणी रवाना केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी