शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

स्वाइनचे सहा तर डेंग्यूचा एक बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 00:36 IST

ठाणे महापालिका हद्दीत डेंग्यूने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर स्वाइन फ्लू आणि लेप्टोची लागण झाल्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे.

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत डेंग्यूने १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. तर स्वाइन फ्लू आणि लेप्टोची लागण झाल्याने २६ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. परंतु, मागील सात महिन्यांत ठाण्यात स्वाइन फ्लूने चांगलेच डोके वर काढल्याचे ठाणे महापालिकेच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.जानेवारी ते जुलै या कालावधीत ७८ जणांना स्वाइनची लागण झाली असून यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत डेंग्यूनेही एकाचा मृत्यू ओढवला असून सात महिन्यात १२५ जणांना त्याची लागण झाली आहेतर ८३ रुग्ण हे संशयित आढळले आहेत.पावसाळा सुरू झाला की साथ रोगांचा फैलाव सुरू होतो. ठाण्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यूची रुग्णांत काहीशी घट झाली असली तरी पावसाळा अद्याप संपला नसल्याने या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तो आटोक्यात आणण्यासाठी फवारणी करत असली तरी ती फायद्याची ठरत नसल्याचेच दिसते. यामध्ये नागरिकांनीदेखील आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साठवून ठेवू नये असे आवाहनही ठाणे महापालिकेने केले आहे.जानेवारी ते जुलै या कालावधीत डेंग्यूचे १२५ संशयित आढळले असून यामध्ये ४२ जणांना त्याची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे स्वाइननेदेखील डोके वर काढल्याचे आकडेवारीतून दिसत आहे.ठाणे महापालिका हद्दीत ७८ जणांना त्याची लागण झाली असून यामध्ये आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जानेवारी ते जुलै या कालावधीत हे रुग्ण आढळले असून यामध्ये ६० वर्षे वयोगटांतील वृद्धांची संख्या ही जास्त असून हा आकडा २७ एवढा आहे. त्या खालोखाल ६० वर्षांपर्यंतच्या १२, ५० वयोगटांपर्यंत १५, ४० वयोगटार्पंत २०, १० ते २० वयोगटातील सहा जणांना आणि ० ते ५ वयोगटांतील तीन जणांनास्वाइनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.>डेंग्यूची लागण झालेले रुग्णमहिना (२०१९) लागण संशयित मृत्यूजानेवारी १७ ०३ ००फेब्रुवारी ०१ ०१ ००मार्च ०० ०२ ००एप्रिल ०१ ०३ ००मे १३ १९ ००जून ०० ४५ ००जुलै ०० १० ०१एकूण ४२ ८३ ०१