शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पळालेल्या कैद्याच्या शोधासाठी पोलिसांची सहा पथके

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 01:12 IST

पळालेल्या न्यायालयीन बंदी नरेश फगुनमल छाब्रिया (२९, रा. साईनाथ कॉलनी, उल्हासनगर) या आरोपीला शोधण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागासह सहा वेगवेगळ्या पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.

ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाजवळून पळालेल्या न्यायालयीन बंदी नरेश फगुनमल छाब्रिया (२९, रा. साईनाथ कॉलनी, उल्हासनगर) या आरोपीला शोधण्यासाठी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागासह सहा वेगवेगळ्या पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये शोधण्याचे आदेश मंगळवारी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत.ठाणे विशेष मकोका न्यायालयात मंगळवारी ४.३० वाजण्याच्या सुमारास सुनावणी झाल्यानंतर पुन्हा ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहाकडे नरेश याला इतर आरोपींसह नेले जात होते. त्याचवेळी कैदी पार्टीच्या बंदोबस्तावरील सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवराम चव्हाण यांच्या हाताला जोरदार झटका देऊन तो पळून गेला. यामुळे त्याच्या शोधासाठी ठाणेनगर पोलीस ठाण्याचे शोध पथक (डीबी) तसेच उल्हासनगरचे हिललाइन, भिवंडीचे शांतीनगर तसेच गुन्हे अन्वेषण विभागाचे युनिट १ ठाणे शहर, युनिट २ भिवंडी आणि युनिट ३ कल्याण अशा सहा पथकांची त्याच्या शोधासाठी निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये सहा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह त्यांचे पथक त्याच्या मागावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्याच्याविरुद्ध चोरी, दरोडा तसेच मकोकांतर्गत उल्हासनगर पोलीस ठाण्यात सात ते आठ गुन्हे दाखल आहेत. ठाणे जिल्हा विशेष मकोका न्यायाधीशांकडे १६ जुलै रोजी सुनावणी झाल्यानंतर त्याला पुन्हा ठाणे कारागृहाकडे पोलीस मुख्यालयाचे जमादार चव्हाण आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्तामध्ये पायी नेले जात होते. कारागृहापासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या किल्ला मारुती मंदिराजवळ आल्यानंतर त्याने वाहतूककोंडीचा फायदा घेऊन चव्हाण यांच्या हाताला धक्का देऊन पलायन केले. चव्हाण यांच्यासोबत असलेल्या इतर कर्मचाऱ्यांच्या हातातही आणखी तीन आरोपी असल्यामुळे त्यांना नरेशचा पाठलाग करता आला नाही. तर, चव्हाण यांना झटका दिल्यानंतरही त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. एका वाहनाच्या आडून तो पसार झाल्याची माहिती त्यांनी ठाणेनगर पोलिसांना दिली.>वॉरंट काढल्यानंतरझाली होती अटक२०१० मध्ये नरेश विरुद्ध दाखल झालेल्या एका प्रकरणात वारंवार वॉरंट बजावूनही तो न्यायालयात सुनावणीसाठी हजर होत नव्हता. अखेर, २६ जूून २०१९ रोजी त्याच्याविरुद्ध न्यायालयाने वॉरंट काढल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. याचदरम्यान त्याच्याविरुद्ध मकोकाचीही कारवाई करण्यात आली.