वसई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर झालेल्या विविध अपघातात तीन महिलांसह सहा जण जागीच ठार झाले आहेत.पेल्हार येथील विश्वकर्मा मंदिरासमोर रस्ता ओलांडताना दोन महिलांना अज्ञात वाहनांनी धडक दिली. त्यात जागीच ठार झाल्या. दुसऱ्या घटनेत तुंगारेश्वरफाटा पुलाजवळ असाच अपघात झाला. सायंकाळी ४.३० च्या दरम्यान एका अज्ञात वाहनाने मोटार सायकलला जोरदार धडक दिली. त्यात स्वार अभिलाष श्यामकुमार नायर (२५,रा. कालीना,सांताक्रुझ) आणि प्रिया अरुण वाणी (२१, रा. नालोपारा पुर्व) हे दोघे जागीच ठार झाले. या दोन्ही अपघातांची वालीव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, अज्ञात वाहन आणि त्याच्या चालकांचा पोलीस शोध घेत आहेत.सकाळी ७.२५ वा. दापचरी आरटीओ चेक पोष्टजवळ, तलासरीत तिसरा अपघात घय्ऋला. ३५ ते ४० वयोगटातील एका पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे तोही ठार झाला.चौथ्या अपघातात गोवणे-वाणगांवातील धनेश उर्फ धर्मा केशव कोरे (२९) हा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ठार झाला. (प्रतिनिधी)
महामार्गावर विविध अपघातात तीन महिलांसह सहाजण ठार
By admin | Updated: January 5, 2017 05:33 IST