लोकमत न्यूज नेटवर्क मुंब्रा : दिवंगत सिनेअभिनेत्री नूतन यांच्या मुंब्य्रातील बंगल्यातील सुरक्षारक्षकास शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणाऱ्या चोरांना पोलिसांनी अटक केली. मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील पारसिक बोगद्याच्या वर दिवंगत नूतन यांचा बंगला आहे. त्यात चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरांना सुरक्षारक्षक कैलास निगुडकर याने रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी त्याला शस्त्राचा धाक दाखवून डांबून बंगल्यातील अंदाजित ५० हजार रु पये किमतीची प्राचीन मूर्ती चोरून नेली होती. कैलास निगुडकर याने याबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ वेगाने तपास करून सुरेश सिंह, उदय झा, चंदन सिंह आणि जितू राम या १८ ते २१ वयोगटांतील कळव्यात राहणाऱ्या चार चोरांसह एकूण सहा चोरांना अटक केल्याची माहिती तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक दिलीप जाधव यांनी ‘लोकमत’ला दिली. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचीन मूर्तीच्या चोरीप्रकरणी सहा जणांना अटक
By admin | Updated: May 7, 2017 05:59 IST