शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत दोन दिवसात सहा मोटर सायकलींची चोरी; वाढत्या वाहन चोरीच्या घटना रोखण्यात पोलीस यंत्रणा हतबल

By नितीन पंडित | Updated: September 2, 2022 19:39 IST

वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यात भिवंडी पोलिसांना पुरता अपयश आले असून वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

भिवंडी: भिवंडी पोलीस परिमंडळ दोन क्षेत्रात मोठ्या संख्येने वाहन चोरीच्या घटना घडत असून बुधवार व गुरुवार अशा दोन दिवसात नारपोली व शांतीनगर पोलीस ठाण्यात तब्बल सहा मोटर सायकल चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. वाढत्या चोरीच्या घटना रोखण्यात भिवंडी पोलिसांना पुरता अपयश आले असून वाहन चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

गुरुवारी नारपोली व शांतीनगर पोलीस ठाण्यात दोन वाहन चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली होती. अर्जुन मंगल झा वय ४२ वर्ष रा. ब्रह्मानंद नगर, कामतघर यांनी त्यांची मोटरसायकल राहत्या घराजवळ उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली याप्रकरणी अर्जुनी यांनी नारपोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर मिलिंद विजय ठाकरे वय ३३ वर्ष रा. भादवड नाका यांनी त्यांचे मोटरसायकल राहत्या इमारतीच्या आवारात उभी करून ठेवली असता दोन अज्ञात चोरट्यांनी डुप्लिकेट चावीने मोटरसायकल चालू करून चोरून नेली.याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन वाहन चोरीच्या घटनांनंतर शुक्रवारी देखील शांतीनगर व नारपोली पोलीस ठाण्यात तब्बल चार वाहन चोरीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. अविनाश लक्ष्मण पाचवणे रा.मिठपाडा,शेलार गाव याने आपली मोटर सायकल रात्री रामनगर, चाविंद्रा रोड, या ठिकाणी उभी केली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंजुरफाटा ओसवाल वाडी येथे राहणारे दिप नागरीया याने आपली दुचाकी भिवंडी रोड रेल्वे स्थानकांच्या पार्किंग मध्ये उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.तर सरवलअली मोहम्मदअली अन्सारी रा.विठ्ठल नगर याने आपली दुचाक ही राहत्या इमारती खाली उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली.  तर नविनकुमार रामनिवास शर्मा याने आपली मोटर सायकल दापोडा येथील डिंपल वाईन शॉपच्या बाजुला रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवली असता सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास ती अज्ञात चोरट्याने पळविली आहे. या तिन्ही घटनांप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :thaneठाणेbhiwandiभिवंडी