शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे परिवहन समितीचे सहा सदस्य चिठ्ठी उडवून झाले निवृत्त, सभापतींनी काढली स्वत:चीच चिठ्ठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 17:51 IST

ठाणे परिवहन समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने सहा सदस्य चिठ्ठी काढून निवृत्त झाले. परंतु यामध्ये विद्यमान सभापती अनील भोर यांनी आपल्याच नावाची चिठ्ठी काढल्याने सभापती पद देखील आता रिक्त झाले आहे. असे असले तरी परिवहन समिती ही शिवसेनेकडेच राहणार आहे.

ठळक मुद्देकॉंग्रेसची परिवहनची एन्ट्री बंदभाजपाचा होणार शिरकाव

ठाणे - ठाणे परिवहन समितीमधील सहा सदस्य चिठ्ठी काढून निवृत्त झाले. परंतु यामध्ये विद्यमान सभापती अनील भोर यांच्या नशीबी मात्र घोर निराशा आली. त्यांनी त्यांच्याच नावाची पहिली चिठ्ठी काढली. त्यांच्यापोठापाठ शिवसेनेचे एकूण दोन, राष्ट्रवादीचे तीन आणि कॉंग्रेसचे एक सदस्य चिठ्ठीद्वारे निवृत्त झाला आहे. यामध्ये नव्या पक्षीय बलाबलाचा फायदा आता शिवसेनेलाच होणार असला तरी भाजपाची एन्ट्री मात्र परिवहनमध्ये पक्की मानली जात आहे. शिवाय कॉंग्रेसची परिवहनमधून कायमची एक्झीट झाली आहे.            ठाणे परिवहन समितीमधील सहा सदस्यांचा कार्यकाळ ३१ मार्च रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे एक महिनाआधीच चिठ्ठी काढून यातील सहा सदस्य निवृत्त केले जाणार होते. त्यानुसार मागील महिन्यात २८ फेब्रुवारी रोजी या संदर्भात विशेष सभा बोलविण्यात आली होती. परंतु या सभेबाबत सर्वपक्षीय खास करुन शिवसेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेत ही सभा तहकुब केली होती. त्यानंतर बुधवारी ही सभा पुन्हा लावण्यात आली. त्यानुसार सभापती अनिल भोर यांच्यावर चिठ्ठी उचलण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. परंतु त्यांनी पहिली चिठ्ठी उडविली आणि नेमकचा त्यांचा नंबर हा निवृत्तीमध्ये लागला. त्यानंतर शिवसेनेचे साजन कसार, राष्ट्रवादीचे तकी चेऊलकर, हेमंत धनावडे, सरेंद्र उपाध्याय हे राष्टÑवादीचे तीनही सदस्य निवृत्त झाले. तर कॉंग्रेसचे एकमेव सदस्य सचिन शिंदे यांच्या नावाची देखील चिठ्ठी निघाल्याने त्यांना देखील आता घर वापसी करावी लागली आहे.२०१६ ला त्यावेळच्या ठाणे महापालिकेतील पक्षीय नगरसेवकांच्या संख्याबळानुसार निवडणूक झाली होती. यामध्ये शिवसेनेचे सात, मनसेचा एक, कॉंग्रेसचा एक आणि राष्ट्रवादीचे तीन सदस्य समितीवर गेले होते. दरम्यान २०१७ रोजी ठाणे महापालिकेच्या निवडणुकीनंतर पक्षीय बलाबल बदलले असून शिवसेना ही एकहाती सत्तेवर आली आहे. त्यामुळे चिठ्ीत त्यांचे केवळ दोन सदस्य जरी बाहेर गेले असले तरी नव्या समीकरणानुसार सुमारे तीन सदस्य त्यांचे समितीवर येण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीला मात्र मोठा फटका असला आहे. त्यांचे तीनही सदस्य बाहेर गेल्याने नव्या समीकरणानुसार केवळ एक ते दोनच सदस्य समितीवर जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे कॉंग्रेसचे मात्र चिठ्ठीमुळे पाणीपत झाले आहे. नव्या समीकरणानुसार आता कॉंग्रेसचा एकही सदस्य परिवहनमध्ये जाणार नसल्याने त्यांची परिवहनची कवाडे बंद झाली आहेत.दरम्यान आता नव्या समीकरणानुसार भाजपाचा देखील आता परिवहनमध्ये शिरकाव होणार आहे. भाजपाचे २३ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानुसार २२ ला एक या निकशानुसार भाजपाचा एक सदस्य परिवहनमध्ये जाणार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. एकूणच चिठ्यांमध्ये शिवसेनेचे सभापती भोर यांची विकेट पडली असली तरी देखील त्यांचे जास्तीचे सदस्य बाहेर न गेल्याने ही त्यांच्यासाठी जमेची बाजू मानली जात आहे. तसेच नव्या समीकरणानुसार पुन्हा परिवहन समिती ही शिवसेनेच्याच ताब्यात राहणार हे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे. 

टॅग्स :thaneठाणेtmcठाणे महापालिकाElectionनिवडणूक