शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सहा. आयुक्त, उपायुक्तांंवर जयस्वालांचा कारवाईचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 03:01 IST

मालमत्ताकर आणि पाणीपट्टीवसुलीचे उद्दिष्ट साध्य न झाल्यास संबंधित प्रभागाच्या सहायक आयुक्त तसेच त्या परिमंडळाच्या उपायुक्तांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे.

ठाणे : मालमत्ताकर आणि पाणीपट्टीवसुलीचे उद्दिष्ट साध्य न झाल्यास संबंधित प्रभागाच्या सहायक आयुक्त तसेच त्या परिमंडळाच्या उपायुक्तांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे थकबाकीदारांची नावे जाहीर करण्याबरोबर त्यांची नळजोडणी खंडित करण्याचेही आदेश त्यांनी शनिवारी झालेल्या एका बैठकीत दिले.दरम्यान, डीपी रोडवरील अतिक्र मणांविरुद्ध सोमवारपासून कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी सर्व सहायक आयुक्तांना दिल्या. नागरी संशोधन केंद्र येथे जयस्वाल यांनी सर्व अधिकाºयांची बैठक घेऊन करवसुलीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मालमत्ताकर आणि पाणीपट्टीवसुलीबाबत निश्चित केलेले उद्दिष्ट कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करण्याच्या सूचनाही दिल्या. अर्थात, वसुली न झाल्यास संबंधित प्रभाग समितीचे सहायक आयुक्त आणि परिमंडळ उपायुक्त यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशाराही दिल्याने अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत. थकबाकीदारांची नळजोडणी खंडित करणे, त्यांची नावे होर्डिंग्ज लावून जाहीर करणे तसेच जप्तीची कारवाई करणे आदी उपाययोजनांच्या माध्यमातून कोणत्याही परिस्थितीत १०० टक्के वसुली झाली पाहिजे, अशा सक्त सूचना त्यांनी आपल्या हाताखालच्या अधिकाºयांना दिल्या. मार्च महिना उजाडला, तरी करवसुलीचे लक्ष्य गाठण्याची चिन्हे दिसत नसल्याचे जयस्वाल आक्रमक झाले आहेत. मार्चअखेरपर्यंत उद्दिष्ट साध्य करण्यावर त्यांनी भर दिला आहे.मालमत्ताकराच्या एकूण ५०० कोटी रुपयांच्या अपेक्षित उत्पन्नापैकी ३५० कोटी रुपयांची वसुली झाली असून अद्याप १५० कोटी रुपये वसूल होणे बाकी आहे, तर पाणीपट्टीच्या एकूण १५० कोटी रुपयांच्या अपेक्षित उत्पन्नापैकी ८० कोटी वसुली झाली असून ७० कोटींची वसुली बाकी आहे.दरम्यान, हरदासनगर, हाजुरी, विद्यापीठ उपकेंद्र रस्ता, वेदान्त हॉस्पिटल, आनंदनगर, वागळे इस्टेटमधील रोड नं. १६ आणि २२ आयटीआयकडे जाणाºया रस्त्यावरील अनधिकृत बांधकामांवर सोमवारपासून कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.अग्निशमन यंत्रणा नसल्याने दोषीवारंवार नोटीस दिल्यानंतरही अग्निशमन यंत्रणा न बसवलेल्या ‘त्या’ हॉटेल्सवर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अशा नियमांचे उल्लंघन करणारी ८६ हॉटेल्स सील करण्याची कारवाई करण्याचे आदेश जयस्वाल यांनी दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे आणि सुनील चव्हाण हेही उपस्थित होते.

टॅग्स :thaneठाणे