शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

व्हॉटसअॅपच्या माध्यमातून उघड झाली सहा कोटींची फसवणूक

By admin | Updated: October 11, 2016 21:38 IST

व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) या सेवेद्वारे अमेरिकन नागरिकांना गंडा घालून त्यांच्याकडून पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०४ इतकी

- जितेंंद्र कालेकर/ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 11 - व्हॉईस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल (व्हीओआयपी) या सेवेद्वारे अमेरिकन नागरिकांना गंडा घालून त्यांच्याकडून पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०४ इतकी रक्कम उकळल्याचे ७२ पैकी सात जणांच्या चौकशीत उघड झाले आहे. त्यांनी बनविलेल्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपच्या सखोल पडताळणीमध्ये ही माहिती उघड झाल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात सांगितले.संपूर्ण देशातच नव्हे तर अमेरिकेतही खळबळ उडवून देणाऱ्या या फसवणुकीच्या तपासातील एकेक धागा उलगडतांना पोलीसही चक्रावले आहेत. ५ आॅक्टोबर रोजी मीरा रोड येथील कॉल सेंटरवर धाड टाकून ७७२ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी ७२ जणांना अटक झाली. त्यांच्यापैकीच महत्त्वाच्या पदावरील कर्मचाऱ्यांनी मोबाईलवर व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप बनविला होता. त्याद्वारे किती परदेशी लोकांकडून किती डॉलर पैसे काढले, याच्या नोंदीही त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या मोबाईलमधून सहायक पोलीस आयुक्त मुमूंद हातोटे, वरिष्ठ निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या पथकाला मिळाल्या आहेत. नवोज उर्फ कबीर वर्धन गुप्ता या व्यवस्थापकाच्या ग्रुपने दोन लाख १६ हजार ६६६ डॉलर (एक कोटी ४३ लाख रुपये) अमेरिकन नागरिकांकडून उकळल्याचे स्पष्ट झाले. गोविंद ठाकूर आणि अंकित गुप्ता या व्यवस्थापकांकडून तीन लाख ४६ हजार ३९५ ची कॉल सेंटरची सामुग्री जप्त केली. त्यांनी दीड लाख डॉलर अमेरिकन नागरिकांकडून उकळल्याचे त्यांच्या व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमधून उघड झाले. तर अर्जून वासूदेव या व्यवस्थापकाच्या चौकशीतूनही बरीच माहिती उघड झाली. त्याच्याकडून कॉलसेंटर कर्मचाऱ्यांच्या पगाराची ८५ हजार ३७० इतकी रोकड आणि काही उपकरणे जप्त केली. १० सप्टेंबर ते ४ आॅक्टोबर २०१६ या एक अवघ्या महिन्यांच्या कालावधीत त्याच्या टीमने एक लाख ७४ हजार ४०५ डॉलर (एक कोटी १५ लाख १० हजार ७३० रुपये) इतकी फसवणूक केली आहे. जॉनसन डॉन्टीस या आयटी एक्सपर्टच्या ग्रुपमधून एक लाख ६५ हजार ४३९ डॉलरची (एक कोटी नऊ लाख १८ हजार ९७४ रुपये) फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. तर अविनाश आणि हिम्मत राजपूत यांच्या ग्रुपने एक लाख ८९ हजार ७२० डॉलर अर्थात एक कोटी २५ लाख २१ हजार रुपये अमेरिकन नागरिकांकडून उकळले असून या सात जणांच्या चौकशीतून त्यांनी पाच कोटी ९१ लाख ५० हजार ७०४ रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे.ठाणे ते अहमदाबाद कनेक्शनया संपूर्ण प्रकरणाची पाळेमुळे ही ठाणे ते अहमदाबाद, दिल्ली आणि अमेरिकेपर्यंत आहेत. त्यामुळे या सर्व ठिकाणी पोलिसांना तपास करावा लागणार आहे. पहिले तीन मजले ‘रग्गड कमाई’चेमीरा रोड येथील पेनकरपाडा हरी ओम आयटी पार्क, बाले हाऊस, युनिवर्सल आऊट सोर्सिंग सर्व्हिसेस आणि ओसवाल हाऊस अशा तीन इमारतींमधील सात कॉल सेंटरवर पोलिसांनी धाडसत्र राबविले. त्यातील पेनकरपाडा हरी ओम आयटी पार्कच्या सातमजली इमारतीमध्ये तर कमाईप्रमाणे विभागणी केली होती. पहिल्या तीन मजल्यावरील कथित कर्मचारी हे महिन्याला तीन ते पाच लाख डॉलर इतकी ‘कमाई’ कॉल सेंटरला करुन देत होते. यामध्ये आयटी एक्सपर्टचा मोठा समावेश होता. तिकडून मिळालेले पैसे ते अहमदाबादला ट्रान्सफर करीत होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे पगारही मोठया वेगाने वाढत होते. तर चार ते सहा मजल्यावरुन एक ते तीन लाख प्रति महिना डॉलर ‘कमाई’ करणारा कर्मचारी वर्ग तैनात केलेला होता. शेवटच्या सातव्या मजल्यावर मात्र त्यांनी गिऱ्हाईकांना जाळ्यात कसे ओढायचे, अमेरिकन भाषेची लकब आणि कसब शिकविण्याचे प्रशिक्षण केंद्र उभारले होते. आता या टोळीने कोणाककडून आणि कसा पैसा हवाला मार्फत स्वीकारला याची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.