शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरमध्ये ‘कल्याण मटका’ जुगार अड्डयावर धाडीत सहा जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 00:29 IST

उल्हासनगर मध्ये अगदी बिनधोकपणे सुरु असलेल्या ‘कल्याण मटका’ या जुगार अड्डयावर ठाणे खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी दुपारी धाड टाकून शब्बीर शेख याच्यासह सहा जणांना अटक केली.

ठळक मुद्देठाणे खंडणी विरोधी पथकाची कारवाईरोकडही जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: उल्हासनगर मध्ये अगदी बिनधोकपणे सुरु असलेल्या ‘कल्याण मटका’ या जुगार अड्डयावर ठाणे खंडणी विरोधी पथकाने मंगळवारी दुपारी धाड टाकून शब्बीर शेख याच्यासह सहा जणांना अटक केली. यावेळी तीन हजार सहाशे रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य पोलिसांनी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.उल्हासनगर क्र मांक पाच मधील जय जनता कॉलनी, मेट्रो बारच्या मागे असलेल्या मोकळया परिसरात मटका जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांना मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ठाणे खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रमेश कदम, जमादार संजय भिवणकर, पोलीस हवालदार नितीन ओवळेकर, पोलीस नाईक महेश साबळे, रोशन जाधव आणि उमेश जाधव आदींच्या पथकाने ७ सप्टेंबर रोजी उल्हासनगर येथील एका मोकळ्या मैदानात जुगार अड्ड्यावर धाड टाकली. त्यावेळी सोशल डिस्टसिंगचे नियम धुडकावून याठिकाणी जुगार अड्डा सुरु होता. याठिकाणी अड्डा चालविणाऱ्या शब्बीर याच्यासह जुगार खेळणारे लालू भांगरे (४९), कैलाश वाधवानी (४९), दिनेश वाधवा (२४), मनोज वाघारी (३५), चेतन कोळेकर (२६) आदी सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जुगाराची सामुग्री आणि साडे तीन हजारांची रोकडही जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास खंडणी विरोधी पथक करीत आहे.