शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडी एमआयएम शहराध्यक्षा विरोधातील गुन्ह्यांसंदर्भात एसआयटी स्थापन करा; खा. इम्तियाज जलील यांची मागणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 19:42 IST

एमआयएम भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या विरोधात खंडणी व बलात्काराचे वेगवेगळे गुन्हे राजकीय दबाव टाकून वेळोवेळी नोंदवून शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत  त्यांना जामीन मिळू नये या साठी काम करीत असल्याचा आरोप

नितिन पंडीतभिवंडी ( दि. ७ ) एमआयएमचे भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या विरोधात मागील एक वर्षां पासून खंडणीसह बलात्काराचे खोटे गुन्हे नोंदवून त्यांच्या व पक्षाच्या राजकीय वाटचालीला रोखण्याचा प्रयत्न काही पोलीस अधिकारी करीत असल्याने सर्व गुन्ह्यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी एमआयएम चे खासदार इम्तियाज जलील यांनी भिवंडी येथे शुक्रवारी केली आहे .ते भिवंडीत शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या कुटुंबियां सह कार्यकर्त्यांच्या भेटी साठी आले असता पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले .या प्रसंगी माजी आमदार वारीस पठाण यांच्यासह एमआयएमचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते .

एमआयएम भिवंडी शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांच्या विरोधात खंडणी व बलात्काराचे वेगवेगळे गुन्हे राजकीय दबाव टाकून वेळोवेळी नोंदवून शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत  त्यांना जामीन मिळू नये या साठी काम करीत असल्याचा आरोप एमआयएम चे खा.इम्तियाज जलील यांनी करून खालिद गुड्डू याचे राजकीय प्रस्थ शहरात वाढत असल्याने राजकीय पक्षांनी हे षडयंत्र रचले असून महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांची मुंबई येथे भेट घेऊन या सर्व गुन्ह्यांची एसआयटी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे .

एमआयएम पक्षाची ताकद शहरात वाढत असून खालिद गुड्डू प्रकरणात न्याय न मिळाल्यास पोलीस उपायुक्त कार्यालया समोर पक्ष प्रमुख खासदार ब्यारिस्टर असउद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले जाईल असा इशारा देखील खा. इम्तियाज जलील यांनी शेवटी दिला .

टॅग्स :AIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनbhiwandiभिवंडी