शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सहकारी बँकांबाबत कठोर धोरणाचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 01:26 IST

पीएमसी बँक घोटाळ्यानंतर राज्यातील अन्य सहकारी बँकांमध्येदेखील डिफॉल्टर असलेल्या संचालकांच्या नियुक्तीला तीव्र विरोध होऊ लागला आहे.

ठाणे : पीएमसी बँक घोटाळ्यानंतर राज्यातील अन्य सहकारी बँकांमध्येदेखील डिफॉल्टर असलेल्या संचालकांच्या नियुक्तीला तीव्र विरोध होऊ लागला असून यासंदर्भात आरबीआयनेदेखील सहकारी बँकांना नियमांची अंमलबजावणी करण्याविषयी तसेच आर्थिक नियंत्रण करण्यासंदर्भात कडक धोरण अवलंबण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे राज्यातील इतर सहकारी बँकांमध्येदेखील पीएमसीसारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे संचालकांसंदर्भात कडक धोरण न अवलंबले गेल्यास खातेदारदेखील आंदोलनाच्या पवित्र्यात येतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.अनियंत्रित कर्जवाटपामुळे गेल्या पाच वर्षांत राज्यातील अनेक बँका या बुडीत निघाल्या आहेत. पीएमसी बँक हे त्याचेच उदाहरण असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुडीत निघालेल्या बँकांमध्ये पीएमसी बँकेबरोबरच सीकेपी आणि रुपी बँकेचादेखील समावेश आहे. देशभरात जवळपास १४०० सहकारी बँका आहेत. मात्र, बहुतांश बँकांमध्ये आरबीआयच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचे उघड झाले आहे.यामध्ये संचालकांची भूमिकादेखील महत्त्वाची आहे. एखाद्या सहकारी बँकेचा संचालक डिफॉल्टर नसावा, ज्या बँकेत तो संचालक आहे, त्या बँकेचा त्याला लाभ घेता येत नाही, तसेच नियम डालवून कर्ज मंजूर करू नये, असे स्पष्ट असताना कोणत्याच सहकारी बँकेत आरबीआयच्या नियमांचे पालन होत नसल्याने हे नियम लागू करण्याची आता जोरदार मागणी सहकारी बँकेच्या खातेदारांकडून जोर धरू लागली आहेहे आहेत नियममल्टी स्टेट को-आॅपरेटिव्ह सोसायटीज अ‍ॅक्ट २००० नुसार ज्या व्यक्तीची एखाद्या सहकारी बँकेच्या संचालकपदी नियुक्ती करायची असल्यास त्या व्यक्तीने एक शपथपत्र सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये त्या संचालकाला त्या बँकेचा लाभ घेता येत नाही. याशिवाय, त्या संचालकांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नसावे, असा नियम आहे. मात्र, अनेक सहकारी बँकांमध्ये या नियमांचे पालन होत नसल्यानेच अशा प्रकारे सहकारी बँकांमध्ये घोटाळे होत असल्याचे समोर आले आहे.केंद्रीय सल्लागारसमिती घेणार गंभीर दखलपीएमसी बँकेच्या खातेदारांच्या बाजूने लढा देणारे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीदेखील यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. पीएमसी घोटाळ्यानंतर केंद्रीय सल्लगार समितीकडून सहकारी बँकाच्या कारभाराबाबत गांभीर्याने विचार करत असल्याची माहिती त्यांनी दिली. अनेक बँका आरबीआयच्या नियमांचे पालन करत नाही तर आरबीआयकडूनदेखील या सहकारी बँकांवर नियंत्रण ठेवले जात नसल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :bankबँकBanking Sectorबँकिंग क्षेत्र