शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या अधिकारात ‘त्या’ फायलींवर स्वाक्षरी, पालिकेचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 01:29 IST

पवार यांनी केलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांच्या वतीने महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे : संजीव जयस्वाल महापालिका आयुक्तांच्या अधिकारात सर्व फायलींवर स्वाक्षरी केली असून त्यामध्ये कोणतीही चूक नसून नगरसेवक नारायण पवार यांनी केलेले आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे असल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांच्या वतीने महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नगरसेवक पवार यांनी महापालिका आयुक्तांनी शहर विकास विभागाच्या २०० फायली निवासस्थानी मागवून त्यावर स्वाक्षरी केली, अशा आशयाचे निवेदन दिले आहे. त्यावर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ४ मार्चपर्यंत संजीव जयस्वाल हे महापालिका आयुक्त म्हणून काम पाहत होते. त्यानंतर वैद्यकीय रजा मंजूर झाल्यानंतर त्यांनी ४ मार्च रोजी माध्यानोत्तर अतिरिक्त आयुक्त (१) राजेंद्र अहिवर यांच्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार सोपवला. त्यामुळे जयस्वाल यांनी ज्या फायलींवर स्वाक्षरी केली आहे, ती महापालिका आयुक्त म्हणूनच केली आहे. त्यामुळे पवार यांनी केलेले आरोप हे चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत.त्याचबरोबर शहर विकास विभागाच्या सुमारे २०० फायलींवर स्वाक्षरी केली, हे वस्तुस्थितीशी विसंगत नाही. ज्या ८ ते १० फायली प्रलंबित होत्या, त्या त्यांच्याबरोबरच विधानसभा तारांकित, अतारांकित प्रश्न, लक्षवेधी प्रश्नांची उत्तरेही अंतिम केली आहेत.त्याचबरोबर महापालिकेच्या अर्थसंकल्पाचा आराखडाही अंतिम केला आहे. शिवाय, आस्थापना आणि महापालिका आयुक्त कार्यालयाकडे इतर विभागांच्या ज्या फायली प्राप्त झाल्या होत्या, त्याच फायलींचा निपटारा केला आहे.>‘अद्याप बदली नाही’माझी अद्यापही बदली झालेली नाही. मी वैद्यकीय रजेवर जात असल्याने आयुक्तपदाचा कार्यभार अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविला आहे. कार्यभार हस्तांतरणानंतर एकाही फायलीवर स्वाक्षरी केलेली नसल्याचे संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.