शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल शाळेतील मुले जग घडवणार - अंकुश चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2018 02:56 IST

राज्यातील अन्य शहरांत सिग्नलवरील मुलांनादेखील चांगले शिक्षण मिळावे, यासाठी तीनहातनाक्याच्या सिग्नल शाळेच्या धर्तीवर त्यात्या ठिकाणी शाळा असाव्यात.

ठाणे : राज्यातील अन्य शहरांत सिग्नलवरील मुलांनादेखील चांगले शिक्षण मिळावे, यासाठी तीनहातनाक्याच्या सिग्नल शाळेच्या धर्तीवर त्यात्या ठिकाणी शाळा असाव्यात. या शाळेतील मुले उद्याचे सुंदर जग घडवतील, यावर माझा संपूर्ण विश्वास आहे, अशा भावना सिनेअभिनेते अंकुश चौधरी यांनी रविवारी ठाण्यात व्यक्त केल्या.भीक ते शिक, पुलाखाली भुतं ते रोबोटिक, कंटेनरवर्ग ते मॉडेल स्कूल असा अवघ्या अडीच वर्षांचा विलक्षण प्रवास ‘मुक्काम पोस्ट तीनहातनाका’ या विशेषांकाच्या माध्यमातून उलगडला. या विशेषांकाचे प्रकाशन रविवारी सिग्नल शाळेत झाले. यावेळी अंकुश चौधरी म्हणाले की, सिग्नलवरील छोटीछोटी मुले सिग्नल शाळेमुळे शिक्षणाच्या मूळ प्रवाहात येऊ शकली. या शाळेत ठाणे शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर कोणताही आडपडदा न ठेवता त्यांना शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून सिग्नल शाळा मोठी केली पाहिजे. आपल्याला नको कोणती जात, नको कोणता पंथ-रंग, आपण सगळे एकत्र येऊन केवळ या शाळेला मदत नाही, तर माणुसकी म्हणून सहकार्य करू या, असे आवाहन त्यांनी केले. या मुलांकडून आपण खूप गोष्टी शिकण्यासारख्या असून या शाळेत शिकवणारे शिक्षक हे कोणत्याही मानधनाशिवाय काम करत आहेत. हे खूपच कौतुकास्पद आहे.अभिजित पानसे, अवधूत गुप्ते, अजित परब, अतुल परचुरे, अमेय खोपकर, विजू माने, शिरीष लाटकर, जयंत पवार आदी सिनेकलावंत, दिग्दर्शक या अंकाच्या प्रकाशनाला उपस्थित होते. पालिका उपायुक्त मनीष जोशी, डॉ. सुबोध मेहता, डॉ. मेधा भावे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर व सिग्नल शाळेच्या प्रवासात गेल्या अडीच वर्षांत साथ देणारे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ‘मुक्काम पोस्ट तीनहातनाका’ या अंकाचे मानद संपादकत्व अभिजित पानसे यांनी भूषवले. दिग्दर्शक विजू माने, शिरीष लाटकर, जयंत पवार, डॉ. विजया वाड, कौशल इनामदार, कुशल बद्रिकेहे अंकाचे अतिथी संपादक आहेत. आरती पवार-परब या अंकाच्या संपादिका असून प्रियंका लबदे यांनी संपादन साहाय्य केले आहे.

टॅग्स :Ankush Chaudharyअंकुश चौधरीthaneठाणे