शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सिग्नल शाळेला बाप्पा पावला, सुमारे ५० हजार देणगी जमा : ठाणे-मुंबईकरांचे सामाजिक भान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2017 03:43 IST

ठाण्यातील सिग्नल शाळेतील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील प्रत्येकाचा मदतीचा हातभार लागावा, या उद्देशाने या गणेशोत्सवादरम्यान समर्थ भारत व्यासपीठच्या वतीने सुरू केलेल्या गणपती देणगी बॉक्सला ठाणे-मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला

स्नेहा पावसकर ठाणे : ठाण्यातील सिग्नल शाळेतील मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील प्रत्येकाचा मदतीचा हातभार लागावा, या उद्देशाने या गणेशोत्सवादरम्यान समर्थ भारत व्यासपीठच्या वतीने सुरू केलेल्या गणपती देणगी बॉक्सला ठाणे-मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आणि सिग्नल शाळेला जणू गणपती बाप्पाच पावला आहे. जवळपास १५० बॉक्समधून सुमारे ५० हजार इतकी देणगी जमा झाली असून त्याचा वापर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांसाठी केला जाणार आहे.सिग्नलवर राहणा-या आणि विविध वस्तू विकणा-या मुलांसाठी वर्षभरापूर्वी तीनहातनाका येथे ठाणे महापालिका आणि समर्थ भारत व्यासपीठच्या वतीने सिग्नल शाळा सुरू करण्यात आली. या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा संस्थेचा प्रयत्न असून शहर बालभिकारीमुक्त करणे त्यांचा मानस आहे. त्यासाठी लोकसहभागाची आणि अर्थातच आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. समाजातील काही व्यक्ती यासाठी साहाय्य करतात. मात्र, ही संकल्पना प्रत्येकापर्यंत पोहोचावी आणि त्यांचा खारीचा वाटा या उपक्रमात असावा, या उद्देशाने गणेशोत्सवादरम्यान शक्य त्यांनी आपल्या घरातील, मंडळातील किंवा सोसायटीतील गणपती बाप्पाच्या पुढे हा देणगी बॉक्स ठेवावा आणि त्यातून जमा होणारी रक्कम सिग्नल शाळेला साहाय्य म्हणून द्यावी, असे आवाहन व्यासपीठाच्या वतीने करण्यात आले होते. त्याला ठाणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला.सुमारे १५० देणगी बॉक्स विविध व्यक्ती, संस्थांनी नेले होते. त्यात काहींनी आपल्या घरच्या गणेशोत्सवात हे बॉक्स ठेवले. ठाण्यातील माधुरी घारपुरे यांच्या विज्ञानविषयक क्लासेसमधील विद्यार्थ्यांनी ३७ बॉक्स नेले होते. तर, मुलुंडमधील एका शाळेनेही २० बॉक्स नेले होते. याशिवाय, काही गृहनिर्माण संस्थांच्या गणेशोत्सवातही हे बॉक्स ठेवण्यात आले होते. त्यात अनेकांनी देणगी टाकून सामाजिक भानजपले.गणेशोत्सवानंतर हे बॉक्स व्यासपीठाकडे जमा झाले असून त्यातून सुमारे ५० हजार देणगी जमा झाली आहे. दिलेल्या देणगीची देणगीदारांना पावती देण्यात येणार आहे.>गणपती देणगी बॉक्स या अनोख्या उपक्रमालाही ठाणे-मुंबईकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या शाळेतील मुलांचा पोशाख, आहार, शैक्षणिक वस्तू, शिक्षकांचे पगार या सगळ्यांचा महिनाभराचा खर्च सुमारे सव्वा लाख रुपये होतो. त्यामुळे देणगी बॉक्समधून जमा झालेल्या रकमेतून शाळेचा अर्ध्या महिन्याचा खर्च नक्कीच भागेल.- भटू सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी, समर्थ भारत व्यासपीठ