शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आजारी झालेल्या परिचारिकेची पैशांसाठी भटकंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 02:30 IST

रुग्णांची सेवा करणाऱ्या या कोरोनायोद्धीकडे स्वत:वरील उपचाराचे बिल देण्याएवढेही पैसे नव्हते.

ठाणे : ज्या परिचारिकेने स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्त र ग्णांची सेवा केली, तिच्यावरच कोरोनाग्रस्त होण्याची वेळ आली. हे संकट एवढ्यावरच थांबले नाही, तर उपचाराचे भले मोठे बिलही तिच्या हातात दिले. रुग्णांची सेवा करणाऱ्या या कोरोनायोद्धीकडे स्वत:वरील उपचाराचे बिल देण्याएवढेही पैसे नव्हते. परंतु, माणुसकी नसलेल्या रुग्णालयाने तेही माफ करण्यास असमर्थता दर्शविल्याने अखेर इतर कर्मचाऱ्यांनी वर्गणी गोळा करून अनामत रक्कम भरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे या रुग्णालयास दिलेल्या सुविधा काढून नियमभंग केल्याप्रकरणी त्याच्या व्यवस्थापनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.लोकमान्यनगर भागात राहणारी एक महिला ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रु ग्णालयात वैद्यकीय कर्मचारी या पदावर काम करते. दुर्दैवाने रुग्णालयात सेवा बजावत असतानाच कोरोनाबधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने तिलाही कोरोनाची लागण झाली. त्यामुळे महापालिकेने घोषित केलेल्या ठाणे पाचपाखडी येथील एका खासगी रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केले. गेले चार दिवस या रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, रुग्णालयात उपचारासाठी दाखल करताच तिला रुग्णालय प्रशासनाने अनामत रक्कम म्हणून २४ हजार रुपये भरण्यासाठी सांगितले. पैसे नसल्याने काही दिवसांनी बंदोबस्त करून भरते असे तिने सांगितले. मात्र, रुग्णालय प्रशासन रोज तिच्याकडे अनामत रक्कम भरण्यासाठी तगादा लावत असल्याने या अवस्थेतही कोरोनाबाधित परिचारिकेने तिच्या मैत्रिणींकडून कर्ज काढून काहींकडून वर्गणी जमा करून रुग्णालयाने मागितलेली अनामत रक्कम भरली. मात्र, कोरोनाबाधित रुग्णाला सगळ्यात जास्त मानसिक आधाराची गरज असताना पैशांसाठी तिच्यामागे तगादा लावणे हे एकाप्रकारे रु ग्णाचा छळच असल्याचे कामगार नेते रवी राव यांचे म्हणणे आहे. परिचारिकेवर उपचार सुरू असून हा खर्च लाखाच्या घरात असण्याची शक्यता आहे.>रुग्णालयाने लाटल्या अनेक सुविधाज्या रु ग्णालयात या परिचारिकेचे उपचार सुरू आहे, त्या रु ग्णालय व्यवस्थापकांनी ठाणे महानगरपालिकेकडून अनेक सुविधा लाटल्या आहेत. ट्रस्ट दाखवून महापालिका आणि सरकारकडून सवलती मिळविल्या आहेत. गरिबांसाठी या रु ग्णालयात २० टक्के बेड देणे बंधनकारक असतानाही रु ग्णालय व्यवस्थापकांकडून नियमभंग केला जात आहे. एकीकडे जनसेवा करणाºया कर्मचाºयांवर जनता फुलांचा वर्षाव करून आभार व्यक्त करत आहेत. दुसरीकडे खासगी रु ग्णालये त्यांची लूट करीत आहेत, असा आरोप या रु ग्णालय प्रशासनावर होत आहे. उपचार सुरू असलेल्या या परिचारिकेला रोज १० हजार रु पये जमा करण्याची सक्ती केली जात आहे. त्यामुळे या आजारातून कसे बरे व्हायचे, असा सवाल तिच्यासमोर उभा राहिला आहे.>... तर आरोग्य कर्मचारीबहिष्कार टाकतीलमुंबई महानगरपालिका अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाºयांसाठी मोफत राहण्याची व्यवस्था करीत आहे. रु ग्णालयात त्यांच्यावर मोफत उपचार होत आहेत. ठाण्यातदेखील अत्यावश्यक सेवा देणाºयांना या सुविधा मिळायला हव्यात. ठाणे महानगरपालिकेच्या परिचारिकेचा पैशांसाठी छळ करणाºया रु ग्णालयावर कारवाई व्हावी. अन्यथा, युनियनचा एकही आरोग्य कर्मचारी कर्तव्यावर हजर होणार नाही.- रवी राव, अध्यक्ष, म्युनिसिपल लेबर युनियन