घर चालविण्याची बहीणभावाने घेतली जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:27 AM2021-06-17T04:27:48+5:302021-06-17T04:27:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुरबाड : मोलमजुरी आणि काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या आदिवासी बांधवांना सध्या रोजगार मिळत नसल्यामुळे ...

Siblings took on the responsibility of running the house | घर चालविण्याची बहीणभावाने घेतली जबाबदारी

घर चालविण्याची बहीणभावाने घेतली जबाबदारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुरबाड : मोलमजुरी आणि काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणाऱ्या आदिवासी बांधवांना सध्या रोजगार मिळत नसल्यामुळे त्यांच्यावर हलाखीची वेळ आली आहे. प्रसंगी पालक स्वत:च्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांचे पोट भरले पाहिजे याकडे लक्ष देतात; पण हातालाच सध्या काम नसल्याने घर कसे चालवायचे या विवंचनेत असलेल्या एका आदिवासी कुटुंबीयांची मुले मच्छरदाणीचा वापर करून मासेमारी करीत आहेत. मिळालेल्या माशांची विक्री करून ते घराचा गाडा हाकत आहेत.

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेल्याने त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. शहरी भागात काबाडकष्ट करणाऱ्या मजुरांवर संक्रांत आली आहे. त्यातच सध्या पाऊसही नियमित पडत नसल्यामुळे ग्रामीण भागात शेतातही रोजगार मिळत नाही. तसेच रानमेवा गोळा करून त्याची शहरी भागात विक्री करण्यासाठी प्रवासाचे साधन उपलब्ध नसल्यामुळे आपल्या संसाराचा गाडा हाकायचा कसा या चिंतेत असणारा शेतमजूर व आदिवासी बांधव हा घर सोडत नाही.

पालकांच्या हाताला काम नाही तर त्यांच्याजवळ चार पैसे येणार कुठून, त्यांच्याकडे रोजगाराचे साधन नसल्याने आपण खाऊचा हट्ट तरी कसा करायचा याचा विचार करून शिरवली येथील सतीष मुकुंद ठाकरे (वय १०) व त्याची बहीण वेदिका यांचे रात्री झोपताना डासांचा त्रास होऊ नये म्हणून आपल्यासाठी आणलेल्या मच्छरदाणीकडे लक्ष गेले. मच्छरदाणीमुळे आपण शेतात तसेच नाल्यात असणारे मासे पकडून आणू शकतो व आपल्या परिवाराच्या पोटाची खळगी भरू शकतो असा विचार त्यांनी केला. ज्या शेतात पाणी साचलेले आहे, त्या ठिकाणी या भावंडांनी दोन्ही बाजूंनी मच्छरदाणी पकडून मासेमारी करत असून, मिळालेल्या माशांची विक्री करून घराला आपल्यापरीने मदत करीत आहेत.

Web Title: Siblings took on the responsibility of running the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.