मुंब्रा : उमेदवारी नाकारल्यामुळे नाराज झालेल्या एमआयएमच्या जनरल सेक्रेटरीने पक्षाच्या स्थानिक कार्यालयाला शनिवारी कुलूप ठोकत शटर डाउन केले. यामुळे पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांत खळबळ उडाली. काही महिन्यांपासून पक्षवाढीसाठी जावेद सय्यद काम करत होते. त्यांनी प्रभाग ३२ मधून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, उमेदवारीसाठी पक्षाचे निरीक्षक मोईनुद्दीन कौसर यांनी त्यांच्याकडे २० लाख रु पयांची मागणी केली. ती देण्याबाबत सय्यद असमर्थ असल्याचे लक्षात येताच त्यांच्याऐवजी पक्षांतर करून आलेल्यांना संधी देण्यात आली. वेगवेगळ्या प्रभागांतून उमेदवारी देण्याची तयारी पक्षनेत्यांनी दर्शवली. मात्र, त्यासाठी वेगवेगळ्या रकमांची मागणी केल्याचा गंभीर आरोप सय्यद यांनी केला. या घटनाक्रमाने नाराज झाल्याने त्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे पोष्टर फाडत कार्यालयाचे शटर डाउन केले. (वार्ताहर)
एमआयएमचे मुंब्य्रात शटर डाउन
By admin | Updated: February 13, 2017 05:01 IST