शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’चे शटडाउन : कल्याण-डोंबिवली होणार घामाघूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 06:15 IST

पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरण कंपनीतर्फे शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विविध उपकेंद्रांवरून होणारा वीजपुरवठा तीन ते चार तास खंडित केला जाणार आहे.

कल्याण - पावसाळ्यापूर्वीच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी महावितरण कंपनीतर्फे शुक्रवारी कल्याण-डोंबिवलीत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. विविध उपकेंद्रांवरून होणारा वीजपुरवठा तीन ते चार तास खंडित केला जाणार आहे. मात्र, ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल ‘महावितरण’ने दिलगिरी व्यक्त केली आहे.कल्याणमधील बारावे उपकेंद्रातून बारावे आणि गोदरेज हिल फीडरवरून होणारा वीजपुरवठा शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ दरम्यान बंद राहणार आहे. याअंतर्गत येणाºया गोदरेज पार्क, शंखेश्वर प्रेसिडेन्सी, बारावेगाव, नीरज सिटी, मंत्री लॅक्शन, टावरीपाडा, खडकपाडा, गोदरेज हिल, राधानगर ते गोल्डन पार्क आदी ठिकाणचा वीजपुरवठा खंडित होईल.खडकपाडा फीडरवरून होणारा वीजपुरवठा सकाळी ११ ते दुपारी ३ दरम्यान बंद राहील. त्यामुळे साई चौक, साई संकुल, चंद्रेश गॅलेक्सी, राधानगर, वायलेनगर, महावीरनगरी, तारांगण, मोहन हाइट्स, मोहन प्राइड, मोहन पॅराडाइज, वनश्री, गोल्डन पार्क, बेतुरकरपाडा, फ्लॉवर व्हॅली, हीना पार्क, मनीषानगर या ठिकाणी वीज नसेल. ‘तेजश्री’ उपकेंद्रातून कर्णिक रोड, रामदासवाडी या फीडरवर होणारा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ बंद राहणार आहे.कर्णिक रोड फीडर भागातील ठाणगेवाडी, साई मंदिर, रामबाग लेन नं. ४, गुरुद्वारा, कर्णिक रोड, कमिशनर बंगला तर रामदासवाडी फीडरवरील दत्तात्रेय कॉलनी, भवानीनगर, संपदा रुग्णालय, आरटीओ, रामदासवाडी येथे वीज नसेल.मोहने उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ बंद राहणार असल्याने मोहने ३ फीडरवरील उच्चदाब ग्राहक ‘स्टेम’ वॉटर सप्लायचा वीजपुरवठा बंद राहणार आहे.सात तास वीज नाहीडोंबिवलीतील एमआयडीसी, आनंदनगर, बाजीप्रभू या अखत्यारीतील गोग्रासवाडी, कºहाडे ब्राह्मण सभागृह, डोंबिवली पश्चिम, स्टार कॉलनी, महावीरनगर, गावदेवी मंदिर, पांडुरंगवाडी, नांदिवली, पी अ‍ॅण्ड टी कॉलनी, गांधीनगर, ठाकुर्ली या परिसरात शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २, असे तीन तास तर उमेशनगर, नवापाडा याठिकाणी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असा सात तास वीजपुरवठा खंडित राहणार आहे.उद्याही दुरुस्तीचे कामदेखभाल दुरुस्तीचे काम काही भागांमध्ये शनिवारीही केले जाणार आहे. दुर्गाडी आणि वल्लीपीर उपकेंद्रातून बंदररोड फीडरवर होणारा वीजपुरवठा सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यामुळे दूधनाका, रेतीबंदर परिसर, कोळीवाडा ते वलीपीर मशिदीपर्यंत त्या कालावधीत वीज नसेल. तर, पत्रीपूल फीडरवरील वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत बंद राहील. यात पत्रीपुलाजवळील परिसर, वल्लीपीर रोड, वल्लीपीर तलावाचा विभाग येतो.

टॅग्स :electricityवीजnewsबातम्या